महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

व्यवसाय परवान्यांसह इतर अर्जांना कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून मंजुरी

11:08 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डकडे मागील महिनाभरात व्यवसाय परवान्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मे महिन्यात व्यवसाय परवान्यासाठी 520 जणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले. यापैकी 385 नागरिकांना व्यवसाय परवाने देण्यात आले. काही परवाने देताना कागदपत्रांची कमतरता, तसेच त्रुटी असल्याने त्यांना परवाने नाकारण्यात आले आहेत. व्यावसायिकांना वेळेत परवाने मिळावेत, यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने ऑनलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. केवळ व्यवसाय परवानेच नाही तर घरपट्टी, पाणीपट्टी यासह इतर कर ऑनलाईन भरून घेतले जातात. मे महिन्यात एम-कलेक्टद्वारे 11 हजार 928 कर जमा करण्यात आला आहे. मे महिन्यात एकूण 6 हजार 576 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी 99.92 टक्के तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडे 26 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 22 अर्जांना स्वीकृती देण्यात आली. सांडपाणी जोडणीसाठी एकूण 13 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 8 अर्ज स्वीकारून त्यांना सांडपाणी जोडणी देण्यात आली. भाडेकरारासाठी 17 अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यापैकी एकाही अर्जावर कॅन्टोन्मेंटने विचार केलेला दिसत नाही.

Advertisement

607 जणांना जन्म दाखला

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील 607 जणांना मे महिन्यात जन्म दाखला देण्यात आला आहे. तर 147 जणांना मृत्यू दाखला दिला आहे. त्याबरोबरच कॅन्टोन्मेंट बोर्डकडे वॉटर टँकरसाठी 59 अर्ज आले होते. त्या सर्वांना मंजुरी दिली. इमारत आराखड्यासाठी दोघांनी अर्ज दाखल केले होते, त्यांचे अर्ज कॅन्टोन्मेंटने नामंजूर केले आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article