मोबिक्विकच्या आयपीओला मंजुरी
700 कोटी रुपयांची उभारणी करणार
वृत्तसंस्था/मुंबई
पेमेंट फर्म मोबिक्विक यांना शेअरबाजारात आयपीओ सादर करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. सदरच्या आयपीओ अंतर्गत कंपनी येणाऱ्या काळात 700 कोटी रुपयांची उभारणी करणार असल्याची माहिती आहे. आयपीओ सादरीकरणासाठी दाखल केलेला अर्ज शेअर बाजारातील नियामक सेबी यांनी मंजूर केला आहे. गुरगावमधील या कंपनीने यावर्षी जानेवारीत पुन्हा एकदा आयपीओसाठी अर्ज केला होता. ताज्या समभागांच्या सादरीकरणातून रक्कम उभारली जाणार आहे. ऑफर फॉर सेलअंतर्गत समभाग विक्रीला नसतील. वित्त सेवा, पेमेंट सेवा, मशीन लर्निंग सह इतर क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या या तंत्रज्ञान कंपनीकडून उभारलेली रक्कम व्यवसाय वाढीसाठी केली जाणार असल्याची माहिती आहे. 4 जानेवारीला यंदा कंपनीने पुन्हा आपला अर्ज नव्याने सेबीकडे सादर केला होता. कंपनी इतरांच्या माध्यमातून 140 कोटी रुपये उभारण्याचीही योजना आखत आहे. वित्त व्यवसाय वाढीसाठी पेमेंट व्यवसायाच्या वाढीसाठी तसेच इतर कारणांसाठी आयपीओची रक्कम वापरली जाणार आहे.