महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्योती स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचे कौतुक

10:35 AM Sep 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : येथील सार्वजनिक शिक्षण खाते बेळगाव यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय  प्राथमिक माध्यमिक क्रीडा स्पर्धेत ज्योती क्लबच्या खेळाडूंनी  घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत  श्रुती निलजकर हिने 100 मी. धावणे द्वितीय व लांब उडीत तृतीय क्रमांक, अनुज हणगोजीने 400 मी. धावणे प्रथम 600 मी. धावणे प्रथम, विराज कुगजीने 600 मी. द्वितीय आणि 400 मी. मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला, सर्वेश नाईकने 1500 मी. तृतीय 3000 मी प्रथम क्रमांक पटकाविला, माध्यमिक विभागात समर्थ कदमने 400 मी. प्रथम 200 मी. द्वितीय व 80 मी. अडथमळा मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर श्रेयस निलजकरने लांब उडी तृतीय क्रमांक मिळवला, खानापूर तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा कुंभार हिने 200 मी. व गोळा फेक मध्ये प्रथम क्रमांक मिळविला, सक्षम कुंभार याने 400 मी. धावण्यामध्ये प्रथम क्रमांक, 80 मी. अडथळा तृतीय क्रमांक, किंजल सावंतने 600 मी. धावण्यामध्ये प्रथम क्रमांक, श्रेया कोलेकरने 1500 मी. धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. या सर्व यशस्वी खेळाडूंचे ज्योती अॅथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबतर्फे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. या सर्व खेळाडूंना क्लबचे ज्येष्ठ प्रशिक्षक एल जी कोलेकर, प्रशिक्षक अनिल गोरे, यांचे मार्गदर्शन लाभत आहे तर क्लबचे सर्व पदाधिकारी व पालक यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article