महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माता-नवजात शिशुंच्या आरोग्याबाबत जेएनएमसीची प्रशंसा

06:46 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोग्य मंत्रालयाकडून दिल्लीत विशेष बैठक उत्साहात : काहेरच्या संशोधन क्षेत्रातील प्राधान्याचा आढावा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

काहेर विद्यापीठाच्या जेएनएमसी कॉलेजच्या महिला आणि बालआरोग्य संशोधन विभागाने शनिवारी नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट सेंटर येथे माता आणि नवजात शिशुंच्या आरोग्याचा दर्जा कसा वाढेल, याबाबत विशेष बैठकीचे आयोजन केले होते. केंद्र सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाचे संचालक डॉ. राजीव बहल यांनी या बैठकीचे उद्घाटन केले.

यावेळी बोलताना त्यांनी माता व नवजात शिशुंचे आरोग्य सुरक्षित राहावे, यासाठी जेएनएमसी करत असलेल्या संशोधनाबद्दल प्रशंसा केली. तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या उपायुक्त डॉ. झोया रिझवी यांनी आरोग्य मंत्रालयाने संशोधन क्षेत्रात कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले आहे, याचा आढावा घेतला.

या बैठकीला काहेर विद्यापीठाचे कुलपती व केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे, थॉमस जेफर्सन युनिव्हर्सिटी फिलाडेल्फियाचे डॉ. रिचर्ड डेरमन, जेएनएमसीच्या प्राचार्य डॉ. निरंजना महांतशेट्टी व काहेरचे संचालक डॉ. शिवप्रसाद गौडर उपस्थित होते.

गर्भवतींचा रक्तक्षय कमी व्हावा यासाठी तसेच प्रसूतीदरम्यान व नवजात शिशुंना गुंतागुंत होऊ नये, यासाठी तसेच प्रसूतीनंतर मातांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी अॅस्पिरिन, अॅजिथ्रोमायसीन यांचा उपयोग कसा होतो, या संशोधनावर प्रत्येकाने मते व्यक्त केली. या बैठकीला आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे प्रतिनिधी, आयसीएमआरचे पदाधिकारी, संशोधक, अभ्यासक, पॉलिसीमेकर्स बहुसंख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article