For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीयूसीत उल्लेखनीय यश मिळविलेल्यांचा कौतुक सोहळा

06:29 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीयूसीत उल्लेखनीय यश मिळविलेल्यांचा कौतुक सोहळा
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

मराठी विद्यानिकेतन येथे पीयूसी द्वितीय परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन व कौतुक सोहळा पार पडला. यामध्ये आरएलएस कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक घेतलेल्या प्रणय पांडुरंग पाटील (97.80 टक्के), लिंगराज कॉलेजची विद्यार्थिनी सौजन्या जत्राटी (98.33 टक्के), प्रणव पांडुरंग पाटील (97 टक्के), ज्योती कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांक मिळविलेली सायली तुपारे (92.66 टक्के), विजय देसाई (94 टक्के), संजना पाटील (94.8 टक्के), अनुष्का गावडे (91.33 टक्के), क्पाशोरी पाटील (90.5 टक्के), जान्हवी कदम (93 टक्के) यांनी यश संपादन केले. मराठी माध्यमात शिकून त्यांनी हे यश मिळविले. याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष सुभाष ओऊळकर, सदस्य प्रा. सुरेश पाटील, सदस्य सीए विनायक जाधव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत व नारायण उडकेकर यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता पवार यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.