For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यसभा स्थायी समितीवर सदानंद तानावडे यांची नियुक्ती

12:45 PM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यसभा स्थायी समितीवर सदानंद तानावडे यांची नियुक्ती
Advertisement

पणजी : राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांची वाणिज्य विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीवर निवड करण्यात आली आहे. ही निवड 2024-25 या सालासाठी आहे. दहा सदस्यीय राज्यसभा खासदारांच्या समितीच्या अध्यक्षपदी तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन आहेत. काल शुक्रवारी 24 संसदीय स्थायी समित्यांची घोषणा करण्यात आली. या समित्या धोरणे, कायदेविषयक विधेयके इत्यादींची छाननी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.दरम्यान,केंद्रीय संसदीय स्थायी समितीवर तानावडे यांची नियुक्ती झाल्याने गोव्यातील कार्यकर्त्यांमध्ये व नेत्यामध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.