For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कॅन्टोन्मेंटच्या सीईओपदी राजीव कुमार यांची वर्णी

06:14 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
कॅन्टोन्मेंटच्या सीईओपदी राजीव कुमार यांची वर्णी
Advertisement

अजित रेड्डीची चारच दिवसांत बदली

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

कॅन्टोन्मेंट बोर्डचे प्रभारी सीईओ अजित रेड्डी यांची अवघ्या चारच दिवसांत बदली करण्यात आली. त्यांच्या जागी राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Advertisement

कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी सीईओ के. आनंद यांनी आपले जीवन संपविल्यानंतर तातडीने बेंगळूर येथील अजित रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी पदभार स्वीकारून केवळ एक बैठक घेतली होती. त्यानंतर ते रजेवर होते. शनिवारी सकाळीही अजित रेड्डी कार्यालयात दाखल झाले होते. राजीव कुमार हे पुढील आठवड्यात पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राजीव कुमार यांनी यापूर्वी अनेक ठिकाणी संरक्षण दलात सेवा बजावली आहे. जबलपूर येथे डीईओ म्हणून सेवा बजावली असल्याने बेळगाव कॅन्टोन्मेंटमध्ये ते कोणता बदल घडवितात, हे पहावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.