For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा शिक्षणाधिकारीपदी लीलावती हिरेमठ यांची नेमणूक

11:58 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्हा शिक्षणाधिकारीपदी लीलावती हिरेमठ यांची नेमणूक
Advertisement

दहा महिन्यांनी बेळगावला कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी 

Advertisement

बेळगाव : मागील दहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारीपदी अखेर लीलावती हिरेमठ यांची नेमणूक करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने बुधवारी नेमणुकीचे आदेश बजावले असल्याने बेळगावला कायमस्वरूपी जिल्हा शिक्षणाधिकारी उपलब्ध झाले आहेत. लीलावती हिरेमठ मागील दोन वर्षांपासून बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. यापूर्वी त्यांनी बेळगाव विभागात अनेक पदांवर काम केले आहे. त्यामुळे शैक्षणिक जिल्ह्याची त्यांना सविस्तर माहिती आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर तेव्हापासून कायमस्वरूपी गटशिक्षणाधिकारी उपलब्ध झाले नव्हते. अखेर बुधवारी कायमस्वरूपी शिक्षणाधिकारी उपलब्ध झाले आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.