For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस आयुक्तपदी इडा मार्टिन यांची नियुक्ती

09:56 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोलीस आयुक्तपदी इडा मार्टिन यांची नियुक्ती
Advertisement

बेळगाव : बेळगावच्या पोलीस आयुक्तपदी इडा मार्टिन मार्बनिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी सायंकाळी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगाव पोलीस आयुक्तपद रिक्त होते. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा हे 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर या पदासाठी चार अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. अखेर इडा मार्टिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. शुक्रवारी राज्यातील चार आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. बदल्यांच्या या यादीत पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) दर्जाचे इडा मार्टिन यांचा समावेश आहे. बागलकोटसह उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यात त्यांनी सेवा बजावली आहे. सुवर्णविधानसौधमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन बंदोबस्तासाठी त्यांनी अनेकवेळा बेळगाव दौरा केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.