महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जिल्ह्यात साडेचार हजार अतिथी शिक्षकांची नेमणूक

10:52 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगावमध्ये 1748 तर चिकोडीत 2736 अतिथी शिक्षक

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता असल्याने तात्पुरत्या स्वरुपात अतिथी शिक्षक नेमण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. जिल्ह्यात प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये मिळून 4 हजार 484 अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील डीएड व बीएड बेरोजगारांना काही महिन्यांसाठी का होईना परंतु रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. कायमस्वरुपी शिक्षक भरती तूर्तास तरी शक्य नसल्याने राज्य सरकारकडून अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जात आहे. बेळगाव जिल्ह्यातील सरकारी शाळांमध्ये रिक्तपदांची माहिती जिल्हा पंचायतीमार्फत राज्य सरकारला कळविण्यात आली होती. दोन दिवसांपूर्वी शिक्षण आयुक्तांनी अतिथी शिक्षक नेमणुकीला परवानगी दिली. त्यानुसार रिक्त पदांवर राज्यभर अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.

Advertisement

अतिथी शिक्षकांना 10 महिन्यांसाठी शाळांमध्ये नेमणूक केली जाते. प्राथमिक शाळांच्या अतिथी शिक्षकांना मासिक 10 हजार रुपये तर उच्च प्राथमिक शाळांच्या शिक्षकांना 12 हजार रुपये मासिक वेतन दिले जाते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात प्राथमिक विभागात 1457 तर उच्च प्राथमिक विभागात 291 अतिथी शिक्षक नेमले जाणार आहेत. तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात प्राथमिक विभागात 2 हजार 231 तर उच्च प्राथमिक विभागात 505 अतिथी शिक्षकांची नेमणूक होणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे यावर्षी पहिल्यांदाच बेळगाव जिल्ह्यात 4484 अतिथी शिक्षकांची नेमणूक होणार आहे. त्यामुळे सरकारी शाळांचा कारभार अतिथींच्याच खांद्यावर असणार आहे.

खानापूर तालुक्यात 394 पदे रिक्त

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात तब्बल 394 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. हा तालुका दुर्गम असल्याने बऱ्याच शिक्षकांनी तालुक्याबाहेर बदल्या करून घेतल्याने पदे रिक्त राहिली आहेत. या जागांवर आता अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. यामध्ये मराठी शाळांमधील पदे रिक्त असल्याने शिक्षणावर परिणाम होत असल्याची तक्रार वारंवार केली जात आहे. तसेच खानापूरच्या दुर्गम भागात अतिथी शिक्षक म्हणूनही काम करण्यास उमेदवार मिळत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

यावर्षी तरी वेळेत वेतन होणार का?

मागील वर्षी अतिथी शिक्षकांना दोन ते तीन महिन्यांतून एकदा वेतन जमा केले जात होते. यामुळे खिशातील पैसे घालून शिक्षकांना शाळेपर्यंत ये-जा करावी लागत होती. त्यामुळे यावर्षी तरी शिक्षकांना प्रत्येक महिन्याला वेतन मिळणार का? असा प्रश्न अतिथी शिक्षकांमधून विचारण्यात येत आहे. अतिथी शिक्षक हा शाळेच्या परिसरातीलच असावा, अशी सूचना करण्यात आल्याने स्थानिक उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article