महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अंगणवाडी कार्यकर्त्या-साहाय्यिकांना मंत्री हेब्बाळकरांकडून नियुक्तीपत्रे

11:02 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात नियुक्ती झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिकांना महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे वितरित करण्यात आली. याचवेळी साहाय्यक पदावरून कार्यकर्ते पदावर बढती झालेल्या व अनुकंपा आधारावर नियुक्ती झालेल्यांनाही आदेशपत्रे देण्यात आली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. नियुक्तीपत्रे वितरित केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता केवळ पात्र उमेदवारांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात 35 अंगणवाडी कार्यकर्त्यांना तर अनुकंपाच्या आधारावर 30 जणांना नोकरी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी केंद्रामध्ये लवकरच माँटेसरी सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी केंद्र व राज्याकडून अनुदान मिळणार आहे. अंगणवाडीच्या मुलांना सकस आहाराबरोबरच गुणवत्तेचे शिक्षणही मिळणार आहे, असे सांगितले. यावेळी उपसंचालक नागराज, सीडीपीओ सुमित्रा उपस्थित होत्या.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article