विविध सरकारी कार्यालयांमध्येही मागासवर्गीय वकिलांची नेमणूक करा
10:20 AM Nov 13, 2023 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : विविध सरकारी कार्यालयांमध्ये वकिलांची नेमणूक केली जाते. त्या ठिकाणी दलित, मागास व अल्पसंख्यांक वकिलांचीही नेमणूक करावी या मागणीसाठी अहिंद वकील संघटनेतर्फे महापालिका उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांना निवेदन देण्यात आले. महापालिका, बुडा, हाऊसिंग सोसायटी व इतर कार्यालयांमध्ये विविध कार्यालयीन कामकाजांसाठी वकिलांची नेमणूक केली जाते. मात्र त्या ठिकाणी अनुसूचित जाती, जमातीच्या वकिलांची नेमणूक करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. त्या ठिकाणीही दलित व इतर समाजाच्या वकिलांची नेमणूक करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, अॅड. विनोद पाटील, अॅड. निंगाप्पा मास्ती, अॅड. यशवंत लमाणी, अॅड. दऱ्याप्पा बेदी, अॅड. रितेश लातूर आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article