महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘आरटीई’ प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करा; प्रभारी प्राथ.शिक्षणाधिकारी अनुराधा म्हात्रे यांचे आवाहन

12:47 PM Apr 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

अर्जासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत

कोल्हापूर प्रतिनिधी

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामधील पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिलीसाठी 25 टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या प्ttज्s://stल्dाहू.स्aप्arasप्tra.gदन्.ग्ह या वेबसाईटवरील Rऊं झ्दूत् या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 16 ते 30 एप्रिल 2024 या कालावधीत सामाजिक वंचित घटक, आर्थिक दुर्बल, घटस्फोटीत तसेच विधवा महिलांचे पाल्य, अनाथ, दिव्यांग, एच.आय.व्ही. किंवा कोविड प्रभावित बालके आदी घटकांतील मुलांच्या प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. जिह्यातील इच्छुक पालकांनी Rऊं पोर्टलवर नमूद कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे यांनी केले आहे.

Advertisement

कालावधीनंतर ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सर्व अर्ज रद्द केले जातील. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना 9 फेब्रुवारी 2024 नुसार बालकाच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यतच्या अंतरावर अल्पसंख्यांक शाळा वगळता अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयं अर्थसहाय्यित शाळा, पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी 25 टक्के पर्यंतच्या जागांवर वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागासवर्ग घटकांतील बालकांना प्रवेश देण्यासाठी पात्र असतील, अशा बालकांना त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण पुरविण्यात येईल.

Advertisement

आरटीई अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
जन्माचे प्रमाणपत्र, निवासी पुरावा, आधार कार्ड (सर्व घटकांना अनिवार्य),सामाजिक वंचित घटक यांच्यासाठी वडीलांचा, बालकाचा जातीचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला (1 लाख रूपयांपेक्षा कमी उत्पन्नाचा) ,परराज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही.

घटस्फोटीत अथवा न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- न्यायालयाचा निर्णय अथवा प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा, बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रे अनिवार्य राहतील.

विधवा महिलांच्या बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा, बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडीलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल घटकातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रे अनिवार्य राहतील. अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- अनाथ बालकांच्या बाबत अनाथालयाची, बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राहय धरण्यात येतील. जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील.

कोविड प्रभावित बालके (ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले) यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे - सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यु प्रमाणपत्र. कोव्हीड 19 मुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, हे वैद्यकीय प्रमाणपत्र हे शासकीय, पालिका, म.न.पा, रुग्णालय अथवा आय.सी.एम.आर. नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल

एच.आय.व्ही. बाधित , प्रभावित बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे- जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र अनिवार्य राहील. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिक्षक, अधिसुचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र. तसेच अर्ज करणाऱ्या सर्व घटकांतील बालकाचे पासपोर्ट साईज रंगीत छायाचित्र आवश्यक आहे.

Advertisement
Tags :
'RTE' admissionAnuradha MhatreEducation Officer
Next Article