For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव वन केंद्रातून करा ई-आस्थीसाठी अर्ज

12:23 PM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव वन केंद्रातून करा ई आस्थीसाठी अर्ज
Advertisement

महापालिकेकडून संकेतस्थळ उपलब्ध : मिळकतधारकांना लाभ घेण्याचे आवाहन

Advertisement

बेळगाव : ई-आस्थी प्रक्रिया अधिक सरळ व सोपी व्हावी, यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. मिळकतधारकांच्या सोयीसाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यासह आता ई-आस्थीचे अर्ज बेळगाव वन केंद्रातून दाखल करता येणार आहेत. शनिवारपासून बेळगाव वन केंद्रांना यासाठी परवानगी दिली असून स्वतंत्र लॉगईनदेखील देण्यात आले आहेत. http://easthi.kar.gov.in या संकेतस्थळावरून मिळकतधारकांना आपले ई-आस्थीचे अर्ज दाखल करता येणार आहेत. महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या शहर व उपनगरातील मिळकतींना महापालिकेकडून ‘ए’ खाता देण्यात येत होते. सदर मिळकतीची नोंद ई-आस्थी प्रणालीअंतर्गत महापालिकेत सुरू होती. मात्र गेल्या चार महिन्यांपासून अनधिकृत मिळकती पण ज्यांची उपनोंदणी कार्यालयात 2024 पूर्वी नोंद आहे, अशा मिळकतींना ‘बी’ खाता दिले जात आहे. सुरुवातीला केवळ तीन महिन्यांसाठी ही मोहीम सुरू केली होती. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे शहरातील सर्व 58 प्रभागांसाठी एकाच ठिकाणी सोय करून दिली होती. त्यानंतर महानगरपालिकेच्या अशोकनगर, कोनवाळ गल्ली आणि गोवावेस येथील

विभागीय कार्यालयांमध्ये ई-आस्थीसाठी अर्ज स्वीकारण्यासह ए व बी खाता दिला जात होता. मात्र या विभागीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार वाढण्यासह एजंट सक्रिय झाल्याची तक्रार यापूर्वी झालेल्या मनपाच्या बैठकीत करण्यात आली. त्यामुळे मनपा आयुक्त शुभा बी. यांनी अचानक तिन्ही विभागीय कार्यालयांना भेट देऊन त्याठिकाणी पाहणी केली असता खरा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. एजंटाकडून आलेल्या फाईलींना तात्काळ मंजुरी दिली जात होती. मात्र स्वत: मिळकतधारक किंवा नगरसेवक एखादी फाईल घेऊन गेल्यास त्यामध्ये त्रुटी सांगून अधिकारी त्रास देत आहेत, असा आरोप करण्यात आला. यावर उपाय म्हणून ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन केली तरीही सर्व्हर व इतर कारणे सांगत फाईलींना मंजुरी देण्यास विलंब होत आहे. शनिवारपासून शहरातील चारही बेळगाव वन केंद्रांतून अर्ज स्वीकारले जात आहेत. यासाठी बेळगाव वन केंद्रांना स्वतंत्र लॉगईन देण्यात आले आहे. त्यानुसार आता मिळकतधारक बेळगाव वन केंद्रातून http://easthi.kar.gov.in या संकेतस्थळावरून ई-आस्थीचे अर्ज दाखल करू शकतात.

Advertisement

स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी

सध्या शहरातील बेळगाव वन केंद्रावर दररोज विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. बेळगाव वन केंद्रातून विविध प्रकारच्या सेवा देण्यासह वेगवेगळ्या खात्यांची बिले भरून घेतली जातात. त्याचबरोबर मनुष्यबळदेखील कमी आहे. उपलब्ध मनुष्यबळावर ई-आस्थीचे काम करणे शक्य नाही. यासाठी स्वतंत्र संगणक व्यवस्था, प्रिंटर उपलब्ध करूनदेण्यासह प्रशिक्षित ऑपरेटरची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे बेळगाव वन पेंद्रातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

बेळगाव वन केंद्रातून अर्ज करा

शहरातील मिळकतधारकांनी ई-आस्थीसाठी यापुढे बेळगाव वन केंद्रातून अर्ज दाखल करावेत. शनिवारपासून बेळगाव वन केंद्रातून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ई-आस्थीसाठी स्वतंत्र संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. आवश्यक कागदपत्रे ऑनलाईनद्वारे अपलोड करावीत.

-शुभा बी., मनपा आयुक्त

Advertisement
Tags :

.