For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उत्तर, दक्षिण गोवा मिळून 22 उमेदवारांचे अर्ज

12:03 PM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
उत्तर  दक्षिण गोवा मिळून 22 उमेदवारांचे अर्ज
Advertisement

उत्तर गोव्यापेक्षा दक्षिणेतील उमेदवारांचे वय कमी

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असून आता अर्ज सादर करण्याची तारीखही काल शुक्रवारी संपुष्टात आली. दक्षिण व उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून मिळून एकूण 22 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील दुहेरी अर्ज वगळून उत्तरेतून 6 व दक्षिणेतून 5 अशा एकूण 11 उमेदारांनी अर्ज दाखल केले आहेत. उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यातील उमेदवारांचे वय कमी आहे. उत्तर गोव्यातील 6 उमेदवारांचे सरासरी वय 53 असून, दक्षिणेतील उमेदवारांचे सरासरी वय 47 असल्याची माहिती उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून प्राप्त झाली आहे. काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप हे सर्वात वयस्क उमेदवार असून त्यांचे वय 77 वर्षे इतके आहे. याच मतदासंघांतील अपक्ष उमेदवार विशाल नाईक हे आतापर्यंत अर्ज दाखल केलेल्या उमेदवारात सर्वात तऊण ठरले आहेत. त्यांचे वय केवळ 33 वर्षे इतके आहे. उत्तर गोव्यात खलप यांच्यानंतर भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचा दुसरा क्रमांक लागतो. ते 71 वर्षांचे आहेत. उत्तर गोव्यात अपक्ष उमेदवार थॉमस फर्नांडिस यांचे वय 61 वर्षे आहे. आखिल भारतीय परिवार पार्टी या पक्षाचे उमेदवार सखाराम नाईक 42 वर्षांचे आहेत. दक्षिण गोव्यातील उमेदवार तुलनेने तऊण असून, रिव्होल्युशनरी गोवन्सचे (आरजी) रूबर्ट परेरा हे केवळ 39 वर्षांचे आहेत. अपक्ष डॉ. कालिदास वायंगणकर (वय 44), भाजपच्या महिला उमेदवार पल्लवी धेंपो (वय 49), अपक्ष अॅलेक्सी फर्नांडिस (वय 49) तर काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस 54 वर्षांचे आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.