कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अॅपलचे नवे उत्पादन लवकरच ग्राहकांच्या भेटीला

06:33 AM Feb 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंपनीचे सीईओ टिम कुक यांची मोठी घोषणा : येत्या 19 फेब्रुवारी रोजी सादर होणार असल्याची माहिती

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

जगातील दिग्गज आयफोन निर्मितीमधील कंपनी अॅपल लवकरच आपले नवीन उत्पादन बाजारात आणणार असल्याची घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत केली आहे. यावेळी आयफोन एसई 4 सादर केला जाणार असल्याची शक्यता आहे. हा नवीन आयफोन नव्या फिचर्ससोबत ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. यात जुना आयफोन 8 प्रमाणेच होम बटण नसणार आहे, तसेच नवीन आणि अत्याधुनिक डिझाइन करण्यात आले आहे. आयफोन 14 ची समान प्रेम आणि ग्लॉसी बॅक सोबत राहणार असून 6.06 इंच ओएलईडी डिस्प्लेही मिळणार आहे.

आयफोनमधील संभाव्य फिचर्स :

डिस्प्ले : 6.06 इंच ओल्ड स्क्रीन

प्रोसेसर : ए18 चिप

रॅम :8 जीबी

स्टोरेज : 128 जीबी

रिअर कॅमेरा :48 एमपी

फोटो कॅमेरा : 12 एमपी

बॅटरी : 3,279 एमएएच क्षमता

कनेक्टिव्हिटी: 5 जी, वायफाय 6, ब्लूट्यूथ 5.3

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article