महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अॅपलची आयफोन 16 आवृत्ती लाँच

06:13 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फोनमध्ये 15 पेक्षा अधिकचे फिचर्स 

Advertisement

वृत्तसंस्था/ कॅनिफोर्निया

Advertisement

जगभरातील सर्वाधिक चर्चेत असणारा अॅपल स्मार्टफोन म्हणून ज्याची ओळख  आहे त्यांचा आयफोन 16 प्रोमॅक्स नुकताच सादर करण्यात आला आहे. आयफोनला जवळपास 6.9 इंच इतक्या आकाराचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच विशेष बदल म्हणजे आयफोन इंटेलिजन्सशिवाय कॅमेरा नियंत्रित करण्यात येणार आहे. यासाठी एक नवीन बटण देण्यात आले आहे. नवीन आयफोन हा 20 सप्टेंबर 2024 पासून भारतीय बाजारात उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

सदरच्या आयफोनची सुरुवातीची किंमत ही 79,900 रुपये आहे, जी 1,84,900 रुपयांपर्यंत जाते. ऑनलाईन आणि स्टोअरमध्ये दोन्ही ठिकाणी सदरचा फोन खरेदी  करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. आयफोन 16 आणि आयफोन 15 च्या किमतीत फक्त 10 हजारांचा फरक आहे.

 

आयफोन 16 या मालिकेतील 5 सर्वात मोठे बदल

आयफोन16 ला ए 18 चिप मिळणार. दुसऱ्या पिढीच्या 3एनएम तंत्रज्ञानावर आधारित आहे. आयफोन 15 ए16 बायोनिक15 चिपसह येतो.

नवीन आयफोनमध्ये एआय फिचर्स देण्यात आले आहेत. आयफोन 15 मालिकेच्या बेस मॉडेल्सवर आढळणार नाहीत, फक्त प्रो आणि मॅक्स मॉडेलवर.

आयफोन 16 ला कॅमेरा नियंत्रित करण्यासाठी साइट बटण मिळणार आहे. तसेच ग्राहकांना मॅक्रोफोटोग्राफी देखील करण्याची संधी मिळणार आहे.

नवीन आयफोन 22तासांमध्ये व्हिडीओ प्लेबॅक ऑफर करतो, आयफोन15 मध्ये 20 तासांच्या तुलनेत याची क्षमता जास्त आहे. तसेच बॅटरीची सुविधा ही सुमारे 10 टक्क्यांनी वाढणार आहे.

नवीन गोळीच्या आकाराचा बॅक कॅमेरा उपलब्ध होणार आहे.

तसेच अॅपल वॉच व एअरपॉड्स सादर केले आहे. अनेक सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article