अॅपलचा ‘इंट्स ग्लोटाइम’इव्हेंट 9 सप्टेंबर रोजी
आयफोन 16 मालिकेचे स्मार्टफोन होणार सादर, अॅपलवॉचसह नवीन एआय फिचर्सही सादर
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
आयफोन निर्मितीमधील दिग्गज कंपनी अॅपल ही 9 सप्टेंबर रोजी वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट आयोजित करणार आहे. कंपनीने ‘इट्स ग्लोटाइम’ या टॅगलाइनसह आधीच अधिकृत आमंत्रणे पाठवण्यास सुरुवात केली आहे.
अॅपल आयफोन 16 मालिकेतील आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स हे फोन या कार्यक्रमात सादर करु शकते. मात्र, कंपनीने या कार्यक्रमात कोणती उत्पादने लॉन्च केली जातील याचा खुलासा मात्र केलेला नाही.
सोमवार, 9 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. कंपनी 2020 पासून प्री-रेकॉर्ड केलेला व्हिडिओ स्ट्रीम करत आहे, ज्यामध्ये ती आयफोन आणि इतर उत्पादनांची नवीन मालिका लॉन्च करते.
डिस्प्लेचा आकार बदलू शकतो
अनेक लीक्सनुसार, अॅपल आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्सचे डिस्प्ले आकार बदलू शकतात. आयफोन16 प्रो मॅक्समध्ये 6.9-इंचाचा डिस्प्ले असू शकतो, तर आयफोन 16 प्रो मध्ये 6.3-इंचाचा डिस्प्ले असू शकतो.