For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅपल भारतात नवीन चार स्टोअर्स उघडणार

06:39 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅपल भारतात नवीन चार स्टोअर्स उघडणार
Advertisement

पुणे, बेंगळूर, दिल्ली-एनसीआरसह मुंबईत उघडणार :स्टोअर्सना मिळतोय चांगला प्रतिसाद

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आयफोन बनवणारी जगातील दिग्गज कंपनी अॅपल भारतात आणखी चार स्टोअर्स उघडणार आहे. पुणे, बेंगळुरू, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई येथे नवीन स्टोअर्स उघडली जातील. कंपनी लवकरच आपला पहिला ‘मेड इन इंडिया’ आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स सादर करणार आहे, असे कंपनीने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

अॅपलचे वरिष्ठ उपाध्यक्ष (रिटेल) डेयर्डे ओब्रायन म्हणाले, नवीन संघ बनवताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही भारतात आणखी दुकाने उघडण्याची योजना आखत आहोत. या देशातील आमच्या ग्राहकांच्या प्रतिसादाने आम्ही उल्हसित झालो आहोत. यापुढील काळात ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

सध्या दिल्ली आणि मुंबईत अॅपलची स्टोअर्स आहेत. अॅपलने एप्रिल 2023 मध्ये भारतात आपली पहिली दोन स्टोअर्स दिल्ली आणि मुंबई येथे उघडली. असे मानले जात आहे की पुढील वर्षी आणखी नवीन स्टोअर्स सुरू होऊ शकतात.

आयफोन-16 प्रो मिळणार लवकरच

निवेदनात म्हटले आहे की, अॅपल आता भारतात आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्ससह सर्व आयफोन 16 मॉडेल्सचे उत्पादन करत आहे. अॅपलने 2017 मध्ये भारतात आयफोन बनवायला सुरुवात केली. अॅपलने सांगितले की भारतात बनवलेले आयफोन16 प्रो आणि प्रो मॅक्स लवकरच आमच्या स्थानिक ग्राहकांसाठी आणि जगभरातील निवडक देशांमध्ये निर्यातीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :

.