For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अॅपल आयफोन आता झाले स्वस्त

06:26 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
अॅपल आयफोन आता झाले स्वस्त
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आयफोन निर्मिती दिग्गज कंपनी अॅपलने आपल्या भारतातील आयफोनच्या किमतीमध्ये कपात करण्यास सुरुवात केली आहे. अॅपलने 5900 रुपयांपर्यंत किमती कमी केल्या आहेत. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये मोबाईल फोनच्या आयातीवर शुल्क कमी करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर अॅपलने याबाबतचा फायदा उठवला आहे.

मोबाईल फोनवर आता आयात शुल्क 22 टक्क्यांवरून 17 टक्के इतके कमी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चार्जर आणि पीसीबीए (स्मार्टफोन असेंबल करणारा महत्त्वाचा घटक) यावरही आयात शुल्क 20 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणले आहे. आयफोन ‘एसइ’ची किंमत आता 49 हजार 900 रुपये ऐवजी 47 हजार 600 रुपये राहणार आहे. सोबतच आयफोन 15 प्रो आणि प्रो मॅक्स च्या किमती देखील कमी करण्यात आल्या आहेत. आयफोन 15 प्रोची किंमत 5100 रुपयांनी कमी होत 1 लाख 29 हजार 800 रुपयांवर आली आहे. त्याचप्रमाणे आयफोन 15 प्रो मॅक्सची किंमतसुद्धा 5900 रुपयांनी कमी करण्यात आली असून तो आता ग्राहकांना 1 लाख 54 हजार रुपयांना खरेदी करता येणारआहे.

Advertisement

  सॅमसंगला नाही मिळणार फायदा

स्मार्टफोन क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी आणखीन एक दिग्गज कंपनी सॅमसंगला मात्र वरील लाभ उठवता येणार नसल्याचे सांगितले जात आहे. सॅमसंगचे स्मार्टफोन सुद्धा 45 हजार रुपयांवर बाजारमध्ये उपलब्ध आहेत. कंपनीचे फोन्स भारतामध्येच तयार होत आहेत.

कमाई बंपर वाढणार?

वर्ष 2019 मध्ये अॅपलची कमाई 11000 कोटी रुपये इतकी होती. तिच यावर्षी वाढून 67 हजार कोटी रुपये इतकी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतातील ही अॅपलची कमाई आजवरची सर्वाधिक असणार असल्याचे बोलले जात असून कंपनीचा भारतीय बाजारातील वाटा सद्यस्थितीला 23 टक्के इतका राहिला आहे.

Advertisement
Tags :

.