अॅपल पुन्हा जगातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनू शकतो
14 वर्षांच्या जोरदार विक्रीनंतर आयफोन-17 मालिकेने सॅमसंगला टाकले मागे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तब्बल एका दशकानंतर अॅपल कंपनीने सॅमसंग कंपनीला मागे टाकले आहे. आता कंपनीच्या या कामगिरीमुळे अॅपल पुन्हा जगातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनू शकते. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, याचे कारण आयफोन-17 मालिकेची वेगाने वाढणारी विक्री राहणार आहे. वर्ष 2011 च्या सुरुवातीला, अॅपलने प्रथम स्थान मिळवले होते.
संशोधनानुसार, सप्टेंबरमध्ये लाँच झालेल्या आयफोन-17 मालिकेला अमेरिका आणि चीन दोन्ही बाजारपेठांमध्ये खूप जोरदार प्रतिसाद मिळाला आहे, ज्यामुळे अॅपलच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, अमेरिका-चीन व्यापार तणाव कमी झाल्यामुळे आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे प्रमुख बाजारपेठांमध्ये आयफोन खरेदी देखील वाढली आहे.
आयफोन विक्री 10 टक्क्यांनी वाढेल
काउंटरपॉइंटचा अंदाज आहे की 2025 मध्ये आयफोन विक्री 10 टक्क्यांनी वाढेल, तर सॅमसंगची विक्री फक्त 4.6 टक्के वाढेल. या वाढीसह, अॅपल या वर्षी सॅमसंगला मागे टाकून नंबर 1 स्थानावर पोहोचेल. 2025 मध्ये जागतिक स्मार्टफोन बाजारपेठ सुमारे 3.3 टक्केने वाढेल आणि अॅपलचा वाटा 19.4 टक्क्यां पर्यंत पोहोचू शकतो.
काउंटरपॉइंट विश्लेषक यांग वांग म्हणाले की आयफोन-17 च्या यशामागील मुख्य कारण म्हणजे कोविड काळात फोन खरेदी करणारे ग्राहक आता त्यांचे फोन अपग्रेड करत आहेत. 2023 ते 2025 दरम्यान 358 दशलक्ष सेकंड-हँड आयफोन विकले गेले, पुढील काही वर्षांत वापरकर्ते नवीन आयफोन मॉडेल्समध्ये अपग्रेड करण्याची शक्यता आहे.
फोल्डेबल फोनमधून विक्री वाढण्याची अपेक्षा
अहवालात पुढे म्हटले आहे की येत्या काही वर्षांत अॅपलची पोहोच आणखी मजबूत होऊ शकते. फोल्डेबल आयफोन आणि
बजेट आयफोन-17 ई 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे, तर कंपनी 2027 मध्ये मोठ्या डिझाइन बदलांसाठी सज्ज आहे. या सर्व कारणांमुळे, काउंटरपॉइंटचा अंदाज आहे की 2029 पर्यंत अॅपल नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड राहील.