कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अॅपल आणि मेटाला 6,783 कोटींचा दंड

07:00 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

युरोपियन कमिशनची कारवाई : दोन्ही कंपन्यांवर गैरप्रकारच्या व्यवसाय पद्धतीचा आरोप

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

गैर व्यवसाय पद्धतींच्या प्रकरणात युरोपियन कमिशनने अॅपल आणि मेटावर कारवाई केली आहे. डिजिटल मार्केट अॅक्ट (डीएमए) अंतर्गत दोन्ही कंपन्यांना 6,783 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. यामध्ये अॅपलवर 500 दशलक्ष युरो (4,868 कोटी रुपये) आणि मेटावर 200 दशलक्ष युरो (1,947 कोटी रुपये) दंड समाविष्ट आहे. बुधवारी आयोगाने अॅपल आणि मेटाला स्पर्धाविरोधी पद्धतींसाठी दोषी ठरवले. डीएमआय अंतर्गत, अॅपलचे अॅप स्टोअर नियम आणि मेटाचे पे किंवा संमती जाहिरात मॉडेल चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणांमध्ये अॅपल आणि मेटाला दोषी ठरवण्यात आले. अॅपलला त्याच्या अॅप स्टोअर नियमांमुळे लक्ष्य करण्यात आले.

आयोगाचा आरोप आहे की, अॅपल डेव्हलपर्सना अॅप स्टोअरच्या बाहेर पेमेंट पर्याय निवडण्याची परवानगी देत नाही, ज्यामुळे स्पर्धा संपुष्टात येते. त्याचवेळी, मेटावर युरोपियन वापरकर्त्यांना फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या जाहिरातमुक्त आवृत्त्यांसाठी पैसे देण्यास सांगण्याचा आरोप आहे. आयोगाचे म्हणणे आहे की जाहिरात देखो या पैसा दो वाला मॉडेल वापरकर्त्यांना सक्ती करते. हे वापरकर्त्यांना मोफत निवड देण्याच्या नियमांचे उल्लंघन आहे. अॅपलला जूनच्या अखेरीस त्यांची उत्पादने बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर कंपनीने पालन केले नाही तर अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो. मेटाच्या बाबतीत, आयोग 2023 मध्ये केलेल्या बदलांची तपासणी करत आहे.

डिजिटल मार्केट कायदा (डीएमए) काय आहे?

डीएमए हा युरोपियन कमिशनने 2024 मध्ये लागू केला होता. हा नियम युरोपियन युनियनच्या 27 देशांमध्ये लागू होतो. त्याचा उद्देश मोठ्या टेक कंपन्यांना नियंत्रित करणे आहे. जेणेकरून लहान व्यवसायांना बाजारपेठेत पोषक संधी मिळतील. ते वापरकर्त्यांना मोफत निवड देखील देते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article