For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंदगड पोलीस स्थानकात हजर राहून मांडले म्हणणे

10:25 AM Mar 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
चंदगड पोलीस स्थानकात हजर राहून मांडले म्हणणे
Advertisement

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांना चंदगड (जि. कोल्हापूर) पोलिसांनी शिनोळी येथे रास्तारोको केला म्हणून नोटीस पाठविली होती. चंदगड पोलिसांनी सीआरपीसी 41 अन्वये ही नोटीस दिल्यानंतर बुधवारी समिती नेत्यांनी हजर राहून प्रक्रिया पूर्ण केली आहे. कर्नाटक सरकारने सुवर्णविधानसौध येथे अधिवेशन घेतल्यानंतर बेळगावात महामेळावा घेण्याचे ठरविले. मात्र महामेळाव्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे शिनोळी येथे रास्तारोको करून मेळावा भरविला. यामुळे चंदगड पोलिसांनी म. ए. चे नेते व कार्यकर्त्यांना दि. 6 रोजी पोलीस स्थानकात हजर राहून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई हे हजर राहून पोलिसांसमोर आपले म्हणणे मांडले. कर्नाटक सरकार येथील मराठी भाषिकांवर दडपशाही करत आहे. त्यामुळे शिनोळी येथे रास्तारोको करून आपला निषेध नोंदविला होता. यावेळी महाराष्ट्रातील नेत्यांनीही पाठिंबा दिला. म. ए. समितीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्याय्यहक्कासाठी महाराष्ट्राकडे आग्रह करण्यात आला. मात्र चंदगड पोलिसांनी नोटीस दिल्यामुळे बुधवारी नेत्यांना पोलीस स्थानकात हजर राहून आपले म्हणणे मांडावे लागले. या नेत्यांच्यावतीने चंदगड येथे अॅड. महेश बिर्जे, तसेच चंदगडचे वकील विष्णू जाजरी यांनी काम पाहिले.

Advertisement

Advertisement
Tags :

.