महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चन्नेवाडी मराठी शाळा वाचविण्यासाठी शिक्षणमंत्र्यांकडे मांडले गाऱ्हाणे

10:29 AM Dec 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रामस्थांनी मंत्र्यांकडे शाळेच्या समस्या मांडून दिले निवेदन

Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

कर्नाटक राज्याचे शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा हिवाळी अधिवेशनानिमित्त बेळगाव येथे आले असताना त्यांची भेट चन्नेवाडी ग्रामस्थांनी घेतली. त्यांच्यापुढे चन्नेवाडी मराठी शाळा वाचविण्यासाठी आपले गाऱ्हाणे मांडून याविषयी निवेदन दिले. चन्नेवाडी गावात पूर्वीपासून मराठी शाळा होती. पण गेल्या काही वर्षापासून ती बंद आहे. विद्यार्थ्यांअभावी ही शाळा बंद पडल्याचे सांगण्यात येते. पण वास्तुस्थिती ही आहे की त्यावेळच्या काही शिक्षकांच्या हवे त्या ठिकाणी बदली झाल्या. या स्वार्थी धोरणामुळे ही शाळा बंद पडली. याला शिक्षणखातेही तितकेच जबाबदार आहे. त्यामुळे पहिलीपासूनच्या बालकांना चार कि. मी. अंतर कापून नंदगडला पायपीट करून जावे लागत आहे. एकीकडे प्रत्येकाला शिक्षण यासाठी प्रशासकीय पातळीवर आटापिटा करून योजना राबविली जात असताना तालुक्यातील एक सुशिक्षित गावातील शाळा बंद पडणे हे सर्वशिक्षण अभियानाच्या प्रयत्नाला खीळ घालण्यासारखे आहे. ही गोष्ट शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनाला ग्रामस्थांनी आणून दिली. गावातील शाळेची जुनी खासगी इमारत मोडकळीस आली असून ती त्वरित दुरुस्त करावी, अशीही मागणी करण्यात आली. या निवेदनाचा स्वीकार करून याबाबत विचार करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article