For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव येथील मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

12:49 PM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव येथील मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
Advertisement

नंदगड येथे बाजारात-घरोघरी पत्रके वाटून जनजागृती 

Advertisement

वार्ताहर/नंदगड

कर्नाटक सरकारने बेळगावसह सीमा भागावर आपला हक्क सांगण्यासाठी हलगा येथे सुवर्ण विधानसौध बांधून बेळगावला उपराजधानीचा दर्जा देऊन या ठिकाणी दरवर्षी विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरवण्यात येते. यावर्षी कर्नाटक सरकारचा हा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी व अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी बेळगावमध्ये अधिवेशनच्या पहिल्या दिवशी मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी बेळगाव येथे मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले आहे.

Advertisement

मेळाव्यात सीमावासीयानी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून मराठी भाषिकांची एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन बुधवारी नंदगड येथे खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले. नंदगड येथील कामाण्णा कुटापासून मेळाव्याच्या जागृतीफेरीला सुरुवात झाली. नंदगड बाजारपेठ, कलाल गल्ली व गावातील काही गल्ल्यातून घरोघरी फिरून मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करण्यात आले. बाजाराच्या निमित्ताने नंदगड व परिसरातील अनेक गावातील लोक नंदगडमध्ये दाखल झाले होते. यावेळी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी जनतेला मेळाव्याला येण्यासाठी आवाहन केले.

मराठी जनता निर्धारापासून मागे हटणार नाही

मराठी जनता आपल्या निर्धारापासूनमराठी जनताजागृतीफेरीत मराठी भाषिक सामील झाले होते. बेळगाव मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू असून, कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर किती अन्याय, अत्याचार केले. तरी मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्याच्या आपल्या निर्धारापासून कधीही मागे हटणार नाही. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा खटला दाखल झाला असून, पुढील महिन्यात सुनावणीला प्रारंभ होणार असल्यामुळे मराठी भाषकांचे मनोबल उंचावले आहे.

त्यामुळेच कर्नाटक सरकारचा बेळगाववर हक्क सांगण्याचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी सोमवारी 8 डिसेंबर रोजी बेळगाव येथे होणाऱ्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. मेळाव्याबद्दलचे महत्त्वही यावेळी पटवून सांगण्यात आले. जनजागृती फेरीमध्ये म. ए. समितीचे नेते मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, आबासाहेब दळवी, म्हात्रू धबाले, निर्धारापासून कधीही मागे हटणार नाही. विनायक चव्हाण, राजाराम देसाई, विठ्ठल गुरव, रणजीत पाटील, शाम सुतार, प्रवीण पाटील, संतोष मिराशी, अशोक देसाई आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.