For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मच्छीमार सहकारी संस्थाना सभासदांची माहिती देण्याचे आवाहन

06:22 PM Jan 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
मच्छीमार सहकारी संस्थाना सभासदांची माहिती देण्याचे आवाहन
fishermen cooperative societies

मालवण प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सहकारी संस्थांनी आपल्या सर्व सभासदांची माहिती विहित नमुन्यात लवकरात लवकर सादर करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग यांचेकडून आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

केंद्र व राज्य शासनाद्वारे राज्यातील मच्छीमार संस्था तसेच संस्थांचे सभासद यांचेसाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. संस्था व त्यांच्या सभासदांची विस्तृत स्वरूपातील अत्यावश्यक माहिती उपलब्ध झाल्यास शासकीय योजनांच्या अंमलबजावणी मध्ये तसेच योजनांचा लाभ पात्र सभासदांपर्यंत पोहचाविण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. तरी संस्थांनी तत्काळ विहित नमुन्यात संस्थेच्या सभासदांची माहितीची संकलित करून कार्यालयास पूर्तता करावी. ज्या संस्था सभासदांची माहिती सादर करणार नाहीत त्या संस्थांवर कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्या संस्थेतील सभासदांना याचा लाभ न मिळाल्यास संस्था कार्यकारीणी पूर्णतः जबाबदार राहील, असे मत्स्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Advertisement
×

.