For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नवीन मतदार कार्ड बनविण्यासाठी आवाहन

06:01 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
नवीन मतदार कार्ड बनविण्यासाठी आवाहन
Advertisement

अंगणवाडी शिक्षिका अथवा तलाठी यांच्याशी संपर्क साधा

Advertisement

वार्ताहर/ किणये

तालुक्यात नवीन मतदार कार्ड बनविण्यासाठी प्रशासनामार्फत आवाहन करण्यात आले आहे. नवीन मतदार कार्ड करण्यासाठी विशेष नेंदणी अभियान शनिवार व रविवार असे दोन राबविण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक ग्राम पंचायत, अंगणवाडी केंद्र व सार्वजनिक ठिकाणी मतदार कार्ड बनविण्यासंदर्भात माहितीपत्र लावण्यात आले आहे.

Advertisement

नवीन मतदार कार्ड बनविण्यासाठी शाळेतील दाखला, आधारकार्ड, दोन फोटो व रहिवासी दाखला आपल्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी गावांमध्ये व अंगणवाडी केंद्रामध्ये एका अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. येणाऱ्या तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, लोकसभा  निवडणुकीसाठी हे मतदार कार्ड उपयोगी ठरणार आहे.

ग्रामीण भागात मतदानाच्या दिवशी मतदार मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव मतदानासाठी आहे की नाही? याची पडताळणी करतात आणि यावेळेला बराच गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे प्रशासनाने अशा राबविलेल्या अभियानादरम्यान 18 वर्षे पूर्ण झालेल्यांनी तसेच ज्याचे मतदार कार्ड नाही अशा नागरिकांनी मतदान कार्ड बनवून घेणे सोयीस्कर ठरणार आहे.

जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा

शनिवारपासून विशेष नोंदणी अभियानाला सुरुवात झाली आहे. हे अभियान उद्या रविवार दि. 3 रोजी सकाळी 10 ते सायं. 5.00 या वेळेतदेखील राबविण्यात येणार आहे. आपल्या गावातील व जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधावा व मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार कार्ड बनवून घ्यावे, तसेच यापुढे मतदार कार्ड बनविण्यासाठी अंगणवाडी शिक्षिका अथवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Advertisement
Tags :

.