कलाकृतीच्या नावावर काहीही...
52 कोटी रुपयांमध्ये विकले गेले टेपने चिकटविलेले केळं
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये एक लिलाव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तेथे टेपने चिकटविण्यात आलेल्या एका केळ्याचा लिलाव करण्यात आला आहे. याच्या खरेदीसाठी लोकांमध्ये चढाओढ दिसून आली आहे. याकरता लोक कितीही किंमत देण्यास तयार होते. याकरता 5.2 दशलक्ष डॉलर्सपर्यंतची बोली लावण्यात आली आहे. म्हणजेच खरेदीदार 43 कोटी रुपयापर्यंत देण्यास तयार होते. अखेर या टेपने चिकटविलेल्या केळ्यात काय होते असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा लिलाव केवळ एका केळ्याचा नव्हता, तर हा एक प्रसिद्ध कलाकृतीचा लिलाव होता. कलाकृतीच्या नावावर येथे भिंतीवर टेपने चिकटविण्यात आलेले केळं होते. हे डक्ट टेपयुक्त केळ मॉरिजियो कॅटेलनचे आर्टवर्क कॉमेडियन आहे. ही एक प्रसिद्ध कलाकृती मानण्यात आली असून न्यूयॉर्कच्या लिलावात याला 5.2 दशलक्ष डॉलर्समध्ये विकण्यात आले आहे. खरेदीदाराने अंतिम देयकाच्या स्वरुपात 6.2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 52 कोटी रुपये दिले आहेत.
चीनच्या उद्योजकाकडून खरेदी
क्रिप्टो उद्योजक जस्टिन सन यांनी 2019 मध्ये व्हायरल झालेल्या कलाकृतीच्या तीन आवृत्तींपैकी एक खरेदी केली आहे. मॉरिजियो कॅटेलनच्या भिंतीवर डक्ट टेपयुक्त केळ्याच्या कलाकृतीचा लिलाव सरू झाल्यावर याच्या विक्री किंमतीचा प्रारंभिक अनुमान 1 ते 1.5 दशलक्ष डॉलर्सचा होता. परंतु प्रत्यक्षात याला खूपच अधिक किंमत मिळाली आहे.
कॉमेडियन नावाच्या 2019 च्या कलाकृतीच्या तीन आवृत्ती आहेत. यातील एकाचा लिलाव न्यूयॉर्क येथे पार पडला. सोथबीमध्ये प्रदर्शित केळ्याच्या खरेदीदाराला एक केळं, डक्ट टेपचा एक रोल मिळणार आहे. तसेच प्रामाणिकतेचे प्रमाणपत्र अन् गाइड बुक देण्यात येणार आहे. ही केवळ एक कलाकृती नाही, तर एका सांस्कृतिक घटनेचे प्रतिनिधित्व करते, जी कला, मीम्स आणि क्रिप्टोकरन्सी समुदायाला जगाला जोडते. ही कृती भविष्यात आणखी अधिक विचार अन् चर्चेला प्रेरित करेल आणि इतिहासाचा हिस्सा ठरेल असे सोथबीने म्हटले आहे.