For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनुपमा, तनिशा-अश्विनी दुसऱ्या फेरीत

06:26 AM Jan 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
अनुपमा  तनिशा अश्विनी दुसऱ्या फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

माजी राष्ट्रीय चॅम्पियन अनुपमा उपाध्यायने येथे सुरू असलेल्या इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र एचएस प्रणॉय व प्रियांशू राजावत यांना संघर्षपूर्ण लढतीत पराभूत झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व तनिशा क्रॅस्टो यांनी दुसरी फेरी गाठली.

पुरुष एकेरीत प्रियांशूने जोरदार लढत दिली. पण त्याला जपानच्या जागतिक सातव्या मानांकित कोदाय नाराओकाकडून 16-21, 22-20, 13-21 असा पराभव स्वाकारावा लागला. सुमारे दीड तास ही लढत रंगली होती. प्रणॉयला चिनी तैपेईच्या सु लि यांगकडून 21-16, 18-21, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement

महिला एकेरीत अनुपमाने आपल्याच देशाच्या व अकादमीतील तिची सहकारी रक्षिता श्रीचा 21-17, 21-18 असा पराभव करीत दुसरी फेरी गाठली. सकाळच्या सत्रात झालेल्या लढतीत आकर्षी कश्यपला पहिल्याच फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगने 21-17, 21-13 असे हरविले. मालविका बनसोडलाही जागतिक चौथ्या मानांकित चीनच्या हा युइकडून संघर्षपूर्ण लढतीत पराभव स्वीकारावा लागला. मालविकाने पहिला चुरशीचा गेम जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये हानने 6-0 अशी झटपट आघाडी घेतली. मण नंतर मालविकाने हानला प्रत्येक गुणासाठी झगडण्यास भाग पाडले आणि 16-15 अशी तिची आघाडीही कमी केली. याचवेळी मालविकाकडून चुका झाल्या आणि त्याला लाभ हानने उठवित हा गेम 21-16 असा घेत बरोबरी साधली. निर्णायक गेमही हानने 21-11 असा जिंकून आगेकूच केली. जागतिक अग्रमानांकित कोरियाच्या अॅन से यंगनेही विजयी सलामी देताना चिनी तैपेईच्या चियू पिन चियानवर 22-20, 21-15 अशी मात केली.

गेल्या महिन्यात गुवाहाटी मास्टर्स स्पर्धेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावणाऱ्या तनिशा क्रॅस्टो व अश्विनी पोनप्पा यांनी दुसरी फेरी गाठताना काव्या गुप्ता-राधिका शर्मा यांच्यावर 21-11, 21-12 अशी मात केली. रुतुपर्णा व श्वेतपर्णा या पांडा भगिनी यांनीही आगेकूच केली असून त्यांनी थायलंडच्या फथारिन ऐमवारीश्रीसाकुल व सरिसा जानपेंग यांच्यावर 7-21, 21-19, 21-14 अशी मात केली.

Advertisement
Tags :

.