For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

अनुपमा, अर्जुन-ध्रुव पोलंडमधील स्पर्धेत विजेते

06:56 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनुपमा  अर्जुन ध्रुव पोलंडमधील स्पर्धेत विजेते

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

नवोदित आश्वासक किशोरवयीन बॅडमिंटनपटू अनुपमा उपाध्याय व पुरुष दुहेरीची जोडी एमआर अर्जुन व ध्रुव कपिला यांनी पोलंडमधील वॉरसॉ येथे झालेल्या ओर्लीन पोलिश ओपन आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

बिगरमानांकित अनुपमाने आपल्याच देशाच्या तान्या हेमंतचा कडवा प्रतिकार 21-15, 11-21, 21-10 असा मोडून काढत एक वर्षाच्या खंडानंतर जेतेपद पटकावले. तिने आठव्या मानांकित तान्याला 55 मिनिटांच्या खेळात नमविले. यापूर्वी 2021 मध्ये अनुपमाने तान्याचा युगांडा इंटरनॅशनल स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव केला होता. जागतिक क्रमवारीत 71 व्या स्थानावर असणाऱ्या अनुपमाने उपांत्य फेरीतही आपल्याच् देशाच्या इमाद फारूकी समियावर 21-16, 21-14 अशी मात केली होती. तान्याने उपांत्य फेरीत द्वितीय मानांकित क्रिस्टिन कुबाला 21-16, 21-7 असा पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. अनुपमाचे हे पाचवे आंतरराष्ट्रीय जेतेपद आहे.

Advertisement

अर्जुन-ध्रुव विजेते

Advertisement

पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन-ध्रुव कपिला यांनी डेन्मार्कच्या सातव्या मानांकित विल्यम क्रीगर बोए व ख्रिस्तियन फॉस्ट काएर यांचा चुरशीच्या लढतीत 15-21, 23-21, 21-19 असा 49 मिनिटांत पराभव करून जेतेपद पटकावले. उपांत्य फेरीतही भारतीय जोडीने चौथ्या मानांकित ख्रिस्तोफर ग्रिमले व मॅथ्यू ग्रिमले या स्कॉटलंडच्या जोडीला 20-22, 21-18, 21-9 असा 58 मिनिटांच्या खेळात पराभवाचा धक्का दिला होता. स्कॉटिश जोडीवर त्यांनी मिळविलेला हा दुसरा विजय आहे. याआधी गेल्या वर्षी माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेतही भारतीय जोडीने त्यांना हरविले होते.

Advertisement
Tags :
×

.