महाराष्ट्र महिला क्रिकेट संघ कर्णधारपदी अनुजा पाटील
कोल्हापूर :
राष्ट्रीय वरिष्ठ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र किक्रेट असोसिएशनच्यावतीने निवडण्यात आलेल्या महाराष्ट्र संघात कोल्हापूरची महिला क्रिकेटपटू अनुजा पाटीलची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये एमसीएने संघ निवड चाचणीचे आयोजन केले होते. यामध्ये अनुजाने दाखवलेल्या क्रिकेट कौशल्याची दखल घेऊन तिच्याकडेच एमसीएने महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. या कर्णधारपदाच्या ऊपाने गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत अनुजा ही महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदाची धुरा चौथ्यांदा सांभाळणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र संघाच्या गटात सौराष्ट्र, विदर्भ, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार या संघांचा समावेश आहे. दिल्लीतील स्टेडियममध्ये महाराष्ट्र संघाचे सामने होणार आहेत. यापैकी 4 डिसेंबरला सौराष्ट, 8 डिसेंबरला हरियाणा, 10 डिसेंबरला उत्तरप्रदेश, 12 डिसेंबरला विदर्भ, 14 डिसेंबरला बिहार आणि 16 डिसेंबरला पंजाब संघाविऊद्ध सामने होणार आहेत.