अनुज हणगोजीची निवड
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेत केएलएस स्कूलचा अनुज हणगोजीने धावण्याच्या विविध प्रकारात तीन सुवर्णपदकासह वैयक्तिक विजेतेपद मिळविले. त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रिडांगणावर आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय अॅथलेटिक स्पर्धेत अनुजने प्राथमिक गटात 600 मी. धावणे, 400 मी. धावणे, व 200 मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सह तीन सुवर्णपदक मिळविली. गेल्या वर्षीही अनुजने 400 व 600 मी. धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक घेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरला होता. स्पर्धेनंतर साधना बद्री, रमेश शिंगद व इतर मान्यवरांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. अनुज हणगोजीला पी. जी. बडकुंद्रीसह इ. सभासद, शाळेच्या मुख्याध्यापिका लक्ष्मी देशपांडे यांचे मार्गदर्शन तर क्रीडा शिक्षक उमेश मजुकर, कौशिक पाटील, यशोदा, अनिल गोरे, कोलेकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.