मुंग्या देखील करतात शस्त्रक्रिया
माणसांमध्ये शारीरिक समस्या किंवा आजार झाल्यावर शस्त्रक्रिया केली जाते. ही गुणवत्ता केवळ मानवाकडेच होती. परंतु अमेरिकेत अशा मुंग्यांचा शोध लागला आहे, ज्या स्वत:च्या साथीदारांचे जीवन वाचविण्यासाठी शस्त्रक्रिया करतात. म्हणजेच पृथ्वीवर माणसांनंतर दुसरा प्राणी देखील वैद्यकीय ऑपरेशन करण्यास सक्षम आहे.
सर्जरी करणाऱ्या मुंग्यांचा शोध फ्लोरिडात लागला आहे. त्यांना कारपेंटर आंट्स म्हटले जाते. या मुंग्या स्वत:च्या वारुळात राहणाऱ्या सहकाऱ्यांच्या पायाला झालेल्या ईजेला ओळखतात, मग ही जखम त्या साफ करतात, मग पाय किंवा त्या हिस्स्याला कापून वेगळा करतात. यासंबंधीचे अध्ययन करंट बायोलॉजी नियतकालिकात प्रकाशित झाले आहे.
जेव्हा आम्ही अवयव कापण्याबद्दल बोलत असतो, तेव्हा याकरता अत्याधिक गुणवत्तेची गरज असते. ही एक जटिल आणि लयबद्ध पद्धत आहे. माणसांमध्ये देखील हे काम करण्यास अधिक वेळ आणि कौशल्याची गरज असते असे जर्मनीच्या वर्जबर्ग युनिव्हर्सिटीतील इकोलॉजिस्ट एरिक फ्रँक याहंनी सांगितले आहे.
2023 मध्ये फ्रँक यांच्या टीमने आफ्रिकन मुंग्यांची एक प्रजाती शोधली होती. याचे नाव मेगापोनेरा एनालिस होते. या मुंग्या स्वत:च्या वारुळात असलेल्या जखमी साथीदारांवर उपचार एंटीमायक्रोबियल पदार्थाने करत होत्या. हा पदार्थ त्यांच्याच शरीरातून निघत असतो. फ्लोरिडाच्या या कारपेंटर मुंग्यांकडे ही क्षमता नाही. परंतु त्या पाय कापण्यास तरबेज आहेत.
.तर अवयव कापण्याचा पर्याय
वैज्ञानिकांनी दोन प्रकारच्या ईजांकडे लक्ष दिले. पहिले फीमर म्हणजेच जांघ आणि त्याच्या खालील हिस्सा म्हणजेच टिबियामध्ये लैक्रेशन. जांघेला झालेल्या जखमेला मुंग्यांना साफसफाईद्वारी बरे करण्याचा प्रयत्न केला. याकरता ते तोंडाचा वापर करतात. ही जखम बरी न झाल्यास तोंडाने पाय कापून वेगळा करण्याचे पाऊल मुंग्या उचलतात.
जीव वाचविण्यास यश
टिबियाला केवळ साफसफाईद्वारेच मुंग्या बरे करतात. या शस्त्रक्रियेचा फायदा जखमी मुंग्या मरण्यापासून वाचतात. जांघेवर झालेली जखम साफसफाईने बरी झाल्यास 40 टक्के मुंग्या वाचतात. जर पाय कापावा लागला तर 90-95 टक्के जखमी मुंग्या वाचतात. टिबियाची जखमी बरी झालयावर 15-75 टक्के मुंग्यांचा जीव वाचतो. मुंग्या केवळ जांघेच्या जखमेनंतरच पाय कापत असल्याचे वैज्ञानिकांना दिसून आले. पायात अन्य ठिकाणी जखम झाल्यास त्या पाय कापत नाहीत. एका जखमी मुंगीचा पाय कापण्यासाठी मुंग्यांना कमीतकमी 40 मिनिटांचा वेळ लागतो.