For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वडगाव परिसरातील कुत्र्यांना अँटीरेबीज लस

12:35 PM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
वडगाव परिसरातील कुत्र्यांना अँटीरेबीज लस
Advertisement

बेळगाव : येळ्ळूर रोड, वडगाव आणि धामणे रोड परिसरात बुधवारी महानगरपालिका व पशुसंगोपन खात्याकडून 32 भटक्या कुत्र्यांना पकडून अँटीरेबीज लस टोचली. सकाळी 7 ते 9 पर्यंत दररोज ही मोहीम राबविली जात आहे. 28 सप्टेंबरपासून महापालिका व पशुसंगोपनतर्फे भटक्या कुत्र्यांना अँटीरेबीज लस टोचण्याची मोहीम सुरू आहे. दिवसेंदिवस या मोहिमेला गती दिली जात आहे. विविध ठिकाणी येणाऱ्या भटक्या कुत्र्यांना जाळीद्वारे पकडले जात आहे. त्यानंतर पशुसंगोपन खात्याचे अधिकारी व कर्मचारी लस टोचत आहेत. बुधवारी कडोली पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉ. गंगरेड्डी यांच्या नेतृत्त्वाखाली लसीकरण केले. यावेळी महापालिका पशुसंगोपन विभागाचे वरिष्ठ पशुनिरीक्षक राजू संकन्नावर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.