कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्हायरसद्वारे अँटीबायोटिक विकसित करणार

06:27 AM Feb 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बॅक्टेरियाच्या विरोधात प्रभावी औषध निर्माण होण्याची अपेक्षा

Advertisement

वैज्ञानिकांनी एका विशेष प्रकारचा व्हायरस जंबो फेजचे अध्ययन करत नवे अँटीबायोटिक विकसित करण्याची शक्यता वर्तविली आहे. फेज हे असे व्हायरस असतात, जे बॅक्टेरियाला संक्रमित करून त्यांचा डीएनए बदलतात आणि स्वत:ची प्रतिकृति निर्माण करण्यासाठी बॅक्टेरियाच्या प्रणालीचा वापर करतात. या प्रक्रियेदरम्यान ते इतक्या अधिक संख्येत वाढतात की, अखेरीस बॅक्टेरिया नष्ट होऊन जातात.

Advertisement

संशोधकांनुसार जंबो फेज जो सामान्य फेजच्या तुलनेत चारपट अधिक डीएनए बाळगतात, बॅक्टेरियाच्या आत एक सुरक्षित स्थान निर्माण करतात. हे स्थान प्रोटीनद्वारे निर्मित एक सुरक्षा कवचाने वेढलेले असते, जे केवळ आवश्यक प्रोटीनलाच आत शिरण्याची अनुमती देते. हे संशोधन नेचर नियतकालिकात प्रकाशित झाले असून यात कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्कोच्या वैज्ञानिकांचे योगदान सामील आहे.

फेज थेरपीवर विशेष लक्ष

जंबो फेज एक प्रकारचे बॅक्टीरियोफेज आहेत, ज्यांचा शोध 100 वर्षांपूर्वी लागला होता. मूळ स्वरुपात सेबॅक्टीरियोफेज छोटे व्हायरससारखे जीव असतात, जे बॅक्टेरियाला संक्रमित करतात, ते आरएनए किंवा डीएनए जीनोमच्या चहुबाजूला एक प्रोटीन पॅप्सूलने तयार झालेले असतात, पूर्वी त्यांना जीवाणू संक्रमणावर उपचार करण्यासाठी संभाव्य उपाय मानले जात होते, परंतु अँटीबायोटिक औषधांच्या विकासासोबत यावरील संशोधन मंदावले होते. परंतु अलिकडच्या वर्षांमध्ये अँटीबायोटिक-प्रतिरोधक बॅक्टेरियाची समस्या वाढल्याने वैज्ञानिकांचे लक्ष पुन्हा फेज थेरपीच्या दिशेने वळले आहे.

नव्या औषधांच्या विकासात मदत

संशोधकांनी प्रयोगांमध्ये स्यूडोमोनास बॅक्टेरियाचा वापर केला आहे. जो अनेक अँटीबायोटिक औषधांबद्दल प्रतिरोधक असतो. या संशोधनाने केवळ नव्या अँटीबायोटिक औषधांच्या विकासात मदत मिळणार नसून फेज थेरपीला अधिक प्रभावीही करता येणार आहे.

जीन संपादन तंत्रज्ञानाचा वापर 

वैज्ञानिकांनी पूर्वीच सीआरआयएसपीआर (क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिंड्रोमिक रिपीट्स) तंत्रज्ञानाचा वापर करत जंबो फेजमध्ये आवश्यक आनुवांशिक परिवर्तन करण्याची पद्धत विकसित केली आहे. हे एक जीन संपादन तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान वैज्ञानिकांना डीएनएमध्ये बदल करण्याची अनुमती देते. हे मूळ स्वरुपात बॅक्टेरियामध्ये व्हायरसपासून वाचण्यासाठी विकसित करण्यात आले होते. बॅक्टेरिया व्हायरसशी लढण्यासाठी व्हायरसच्या जेनेटिक कोडला छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये कापतो. हे तुकडे बॅक्टेरियाच्या स्वत:च्या जीनोममध्ये संग्रहित असतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article