महाकाल नगरीच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम
वृत्तसंस्था/ उज्जैन
महाकालचे नगर उज्जैनने पुन्हा एकदा कमाल करून दाखली आहे. तेथे 1500 लोकांनी एकाचवेळी 10 मिनिटांपर्यंत डमरू वादन करत विश्वविक्रम sकला आहे. तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव नोंदविले आहे. श्रावण सोमवारी ही विश्वविक्रमी कामगिरी करण्यात आली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने या कामगिरीसाठी विश्वविक्रमाचे प्रमाणपत्रही प्रदान केले आहे. गिनिज बुकच्या वतीने खासदार अनिल फिरोजिया, आमदार सतीश मालवीय आणि संतांना हे प्रमाणपत्र सोपविण्यात आले. तर महाकाल लोकनजीक शक्ती पथावर 1500 लोकांनी एकाचवेळी डमरू वाजविला आहे.
हा विश्वविक्रम महाकाल सवारी निघण्यापूर्वी नोंदविण्यात आला आहे. उज्जैनमध्ये असलेल्या महाकाल लोक नजीक निर्माण करण्यात आलेल्या शक्तिपथावर एकाचवेळी 1500 जणांनी 10 मिनिटांपर्यंत डमरू वाजविला आणि उज्जैनच्या नावावर विश्वविक्रम नोंदविला आहे. यापूर्वी हा विक्रम फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन न्यूयॉर्कच्या नावावर होते. या संघटनेच्या वतीने 488 जणांनी डमरू वादन केले होते.
मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या पुढाकारानुसार उज्जैनमध्ये ही विश्वविक्रमी कामगिरी करण्यात आली आहे. विश्वविक्रम नोंदविण्यात आल्यावर यादव यांनी शहराला शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. सोमवार डमरू उत्सवात उपमुख्यमंत्री जगदीश देवडा, मंत्री गोविंद सिंह राजपूत सामील झाले होते.
महाकाल सवारीच्या भव्यतेसाठी पुढाकार
उज्जैन दक्षिणचे आमदार आणि मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या विशेष पुढाकाराद्वारे महाकालच्या सवारीला भव्य आणि दिव्यता प्रदान केली जात आहे. महाकाल सवारीला भव्यता प्रदान करण्यासाठी अनोखे प्रयत्न करण्यात आले आहेत. प्रथेनुसार महाकाल नगरीत श्रावण सोमवारी संध्याकाळी 4 वाजता महाकाल हे पालखीतून उज्जैनवासीयांना दर्शन देत असतात.