For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी; आत्महत्या करण्यापूर्वी तरूणाने लिहली चिठ्ठी

12:02 PM Jan 06, 2024 IST | Kalyani Amanagi
मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी  आत्महत्या करण्यापूर्वी तरूणाने लिहली चिठ्ठी
Advertisement


धाराशिव प्रतिनिधी

Advertisement

मराठा आरक्षणासाठी समाजातील मराठा तरुण आक्रमक बनत असून काही युवक मराठा आरक्षणामुळे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याच्या कारणाने नैराश्यात जाऊन आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे सरकारला नेमके आणखी किती बळी घ्यायचे आहेत अशी लोकभावना तयार होत आहे. कळंब तालुक्यातील दहिफळ येथे गुरुवार (दि ४ जानेवारी) रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास रोहण राजेंद्र भातलवंडे या १९ वर्षाच्या मराठा तरुणाने चिठ्ठी लिहून शेतातील बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

मयत तरुण रोहण राजेंद्र भातलवंडे याने १० वी पर्यंत शिक्षण घेऊन कृषी पदविका डिप्लोमा कोर्स केला आहे. नोकरीच्या शोधात फिरला परंतु कुठे नोकरीची संधी मिळाली नाही. म्हणून गावात दुधडेअरीचा व्यवसाय सुरू केला. दुधाचा व्यवसाय चालवत असताना स्वतः च्या तीन गायी सांभाळत होता. शिक्षणासाठी इतका खर्च होऊनही आपण शेवटी काय करतोय अशा विचाराने तो सतत बेचेन असायचा. व्यवसायात नफा कमी तोटा अधीक होत आहे हे ल क्षात आले. आपण कृषी पदविका शिक्षण घेऊन काय फायदा झाला. कुठे नोकरीची संधी उपलब्ध होत नाही. जर आरक्षण असते तर आणखी शिक्षण घेऊन कुठतरी संधी मिळाली असती. जवळच्या मित्रा जवळ बोलत तो सतत आपल्या विचारात एकांतात वावरत होता. मराठा आरक्षणा संदर्भात गावात बैठक घेण्यात आली होती. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुःखद घटना घडली आहे. मराठा आरक्षणासाठी मी बलीदान देत आहे. सरकारने जागे व्हावे व मराठ्यांना आरक्षण जाहीर करावे असा मजकूर लिहून रोहण राजेंद्र भातलवंडे याने गळफास घेऊन जीवन संपविले आहे. एकीकडे आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. तर युवक हताश होऊन गळफास घेऊन आत्महत्या करत आहेत.

Advertisement

मराठा आरक्षणासाठी सरकारने ठोस पावले उचलत आत्महत्याग्रस्त युवकांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य देण्याची गरज समाजातून व्यक्त होत आहे. सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करून मराठा युवकांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे. परंतु नुकताच वयात आलेला मुलगा मराठा आरक्षणाच्या सरकारच्या घोळघालू धोरणामुळे बळी गेल्याने भातलवंडे कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले आहे, या घटनेमुळे दहिफळ व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.