मनिकर्णिका कुंडात सापडले आणखी एक शिवलिंग
कोल्हापूर :
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळ खोदकाम करुन उजेडात आणलेल्या प्राचीन कालिन मनिकर्णिका कुंडात आणखी एक शिवलिंग सापडले आहे. फुट ऊंदीचे हे शिवलिंग आहे. कुंडाच्या पश्चिम बाजूला असलेल्या भिंतीच्या दिवळीमध्ये हे शिवलिंग होते. कुंडातील गाळ काढत असताना संबंधीत कर्मचारी कुंडांच्या भिंतीच्या असलेली मातीही काढत होते. भिंतीची माती पूर्णपणे हटल्यानंतर एक दिवळी दिसली. त्या दिवळीतीलही माती काढताना कर्मचाऱ्यांना शिवलिंग निदर्शनास आले. त्यांनी कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेऊन दिवळीतील शिवलिंगे बाहेर काढून ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्त केली.
दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी पुढाकार घेऊन मनकर्णिका कुंड खुला करण्याचे काम हाती घेतले होते. सध्या या कुंडाचे ठेकेदाराकडून जतन व संवर्धनाचे काम केले जात आहे. त्यासाठी देवस्थान समितीकडून कोट्यावधी ऊपये खर्च करण्यात येत आहे. मात्र सद्यस्थिती संवर्धनाचे काम संथगतीने सुऊ असल्याने उलट सुलट प्रक्रीया उमटत आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी याच मनिकर्णिका कुंडात एक शिवलिंग सापडले होते.
बुधवारी सापडलेले आणि पूर्वी सापडलेले शिवलिंग कुंडातील दिवळीत स्वच्छ कऊन ठेवण्यात आले आहे, असे समिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.