महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एडनच्या आखातात पुन्हा जहाजावर हल्ला

07:00 AM Jan 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘आयएनएस विशाखापट्टणम’ची मदतीला धाव : अलर्ट मिळताच कारवाई : नौदलाने दिले चोख प्रत्युत्तर

Advertisement

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

अरबी समुद्रातील एडनच्या आखातात व्यापारी जहाजांवर हल्ला करण्याचे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. गुरुवारी आणखी एका जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आल्यामुळे जहाजाला आग लागली. मात्र, आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. जहाजावर मार्सन बेटाचा ध्वज लावण्यात आला होता. रात्री 11.11 च्या सुमारास हा हल्ला झाल्याचे भारतीय नौदलाला समजले. त्यानंतर भारतीय नौदलाने मदतीसाठी विशाखापट्टणम युद्धनौका पाठवली होती. जहाजावर 9 भारतीयांसह एकूण 22 क्रू मेंबर्स होते. या हल्ल्यात कोणालाही इजा झालेली नाही. समुद्रातील जहाजांवर हुथी बंडखोर आणि चाच्यांचे हल्लेही भारतावर परिणाम करत आहेत. दोन्ही गटांनी भारतात येणाऱ्या जहाजांना अनेकदा लक्ष्य केले आहे. भारतीय नौदलाच्या निवेदनानुसार, एडनच्या आखातात चाचेगिरीविरोधी गस्त घालणाऱ्या आयएनएस विशाखापट्टणमने बुधवारी रात्री 11:11 वाजता ड्रोन हल्ल्यानंतर मार्शल आयलंड्सच्या ध्वजांकित एमव्ही जेन्को पिकार्डी जहाजाच्या आपत्कालीन कॉलला त्वरित प्रतिसाद दिला. भारतीय नौदलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कारवाई करून मदत केली.

जहाजात नऊ भारतीयांसह 22 जण

एडनच्या आखातातील समुद्री चाच्यांवर लक्ष ठेवण्याच्या कर्तव्यावर तैनात असलेली आयएनएस विशाखापट्टणम मिशन मोडमध्ये काम करते. एडनच्या आखातातील हल्ल्याच्या धोक्मयाशी संबंधित कॉलला तत्काळ प्रतिसाद देत नौदलाने सुमारे एक तासानंतर व्यापारी जहाजाला गाठले. रात्री 12.30 च्या सुमारास एमव्ही जेन्को पिकार्डी या व्यापारी जहाजाला मदत पुरवण्यात आली. जहाजावर 9 भारतीयांसह एकूण 22 क्रू मेंबर्स होते. नौदल जवानांच्या मदतीने जहाजाची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली.

यशस्वी मोहिमेनंतर जहाज पुढे रवाना

मदतकार्य पूर्ण केल्यानंतर गुरुवारी सकाळी तंत्रज्ञांनी व्यापारी जहाजाची पूर्ण तपासणी केली. त्यानंतर जहाजाला पुढील प्रवासासाठी सुरक्षित घोषित केल्यानंतर जहाज पुढील बंदराकडे रवाना झाले. हे जहाज मार्शल आयलंड या अमेरिकन बेटाचे आहे. हे जहाजावरील ध्वजाद्वारे सूचित केले जाते. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी व्यापारी जहाजावर हल्ला झाला ते ठिकाण एडन बंदराच्या दक्षिणेला 60 नॉटिकल मैल अंतरावर होते.

यापूर्वीही दोनवेळा हल्ले

गेल्या काही महिन्यांपासून इराण समर्थित हुथी बंडखोर सातत्याने व्यापारी जहाजांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांनी मिळून येमेनमधील हुथींच्या ठाण्यांवर हवाई हल्ले केले. त्याचबरोबर या दोन्ही ठिकाणी भारताने आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. 4 जानेवारी रोजी सोमालियन चाच्यांनी अरबी समुद्रात लायबेरियन ध्वजांकित जहाज लीला नोफोर्कचे अपहरण केले. जहाजाने ब्रिटनच्या मेरिटाइम टेड ऑपरेशन्स पोर्टलवर संदेश पाठवला होता. याबाबत माहिती मिळताच भारतीय नौदलाने अपहरण झालेल्या जहाजाच्या सुटकेसाठी युद्धनौका आयएनएस चेन्नई आणि मेरीटाइम पेट्रोलिंग एअरक्राफ्ट रवाना केली. यानंतर, जहाजावरील सर्व 15 भारतीयांसह एकूण 21 क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका करण्यात आली. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी भारतात येणाऱ्या केम प्लूटो या मालवाहू जहाजावर हिंदी महासागरात हल्ला झाला होता.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article