For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विशेष स्टीलसाठी आणखी एक पीएलआय योजना सुरु होणार

06:31 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
विशेष स्टीलसाठी आणखी एक पीएलआय योजना सुरु होणार
Advertisement

सरकार आणखीन एक योजना आखण्याच्या तयारीत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विशेष स्टीलसाठी सरकार आणखी एक पीएलआय योजना सुरू करणार आहे. तसे संकेत पोलाद सचिवांनी व्यक्त केले आहेत. पोलाद सचिव संदीप पौंडरिक म्हणाले की, पहिल्या फेरीला अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने सरकार विशेष स्टीलसाठी पीएलआय योजनेच्या दुसऱ्या फेरीवर काम करत आहे.

Advertisement

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत भारतीय उद्योग परिसंघ स्टील समिट 2024 मध्ये ही माहिती दिली. स्पेशॅलिटी स्टील देखील आता एक क्षेत्र आहे जेथे अधिक काम करणे आवश्यक आहे, असे पौंडरिक म्हणाले. सरकारने एससीओला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजना सुरू केली, परंतु त्याची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे झाली नाही.

‘म्हणून आम्ही पीएलआयची आणखी एक फेरी करत आहोत जेणेकरून आम्हाला विशेष स्टील व्यवसायात अधिक लाभ मिळवता येईल,’ ते म्हणाले.

सरकारने विशेष स्टीलसाठी 6,400 कोटी रुपयांची पीएलआय योजना सुरू केली होती, त्यापैकी केवळ 2,600 कोटींचे वाटप करता आले. संरक्षण, ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रात विशेष स्टीलचा वापर केला जातो.

Advertisement
Tags :

.