For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओपन एआयच्या सीटीओ मीरा मुरती यांचा राजीनामा

07:00 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओपन एआयच्या सीटीओ मीरा मुरती यांचा राजीनामा
Advertisement

वृत्तसंस्था/कॅलिफोर्निया

Advertisement

नोव्हेंबर 2023 मध्ये, जेव्हा ओपन एआय यांच्या संचालक मंडळाने सॅम ऑल्टमन यांना कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मुराती यांची कंपनीचे अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. चॅटजीपीटी तयार करणारी कंपनी ओपन एआयच्या पहिल्या 3 तांत्रिक अधिकाऱ्यांनीही त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. यामध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मीरा मुराती, उपाध्यक्ष-संशोधन बॅरेट जोफे आणि मुख्य संशोधन अधिकारी बॉब मॅकग्रू यांचा समावेश आहे. मुरती यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपला राजीनामा जाहीर केला आहे. मीरा मुरती यांनी एक्सवर लिहिले-‘मी खूप विचारविनिमय केल्यानंतर,  ओपनएआय सोडण्याचा कठीण निर्णय घेतला आहे. ओपनएआयच्या टीमसोबतची माझी साडेसहा वर्षे हा एक विलक्षण प्रवास राहिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आता मला स्वत:साठी जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे.

मीरा सर्व गोष्टींसाठी धन्यवाद-ऑल्टमन

Advertisement

सह-संस्थापक ऑल्टमन यांनी मीरा मुरातीच्या पोस्टला उत्तर दिले आणि लिहिले - ‘मीरा प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. ओपनएआय, आमचे ध्येय आणि वैयक्तिकरित्या आपल्या सर्वांसाठी मीरा किती महत्त्वाची आहे हे सांगणे कठीण आहे. ती पुढे काय करेल यासाठी मी उत्सुक आहे. आम्ही तुम्हाला लवकरच या बदलाच्या योजनांबद्दल अधिक सांगू.’ 2012 ते 2013 या कालावधीत त्यांनी झोडीक अॅरोस्पेसमध्ये आणि 2018 मध्ये ओपनएआयमध्ये सामील होण्यापूर्वी टेस्ला येथे काम केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, 2011 मध्ये इंटर्न म्हणून त्यांनी गोल्डमन सॅच येथे करिअरला सुरुवात केली.

Advertisement
Tags :

.