महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सलमान हत्या कटातील आणखी एकाला अटक

06:05 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हरियाणात घेतला होता आश्रय : रेकी करणाऱ्यांमध्ये समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ भिवानी

Advertisement

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी हरियाणातून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीचा सदस्य आहे. दीपक गोगलिया उर्फ जानी वाल्मिकी याला स्थानिक पोलिसांच्या मदतीने हरियाणातील भिवानी येथून अटक करण्यात आली. त्याला रविवारी भिवानी येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आरोपीला पनवेल-नवी मुंबई येथे आणण्यात आले आहे.

सलमानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक हरियाणाला पोहोचले होते. या पथकाने संबंधितावर कारवाई केली असून आता याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहोचली आहे. या घटनेत एकंदर 21 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत पाच जणांना पकडल्यानंतर उर्वरित 16 संशयितांचा शोध सुरू आहे.

दीपक गोगलियाने इतर आरोपींच्या निवासाची व्यवस्था करण्याबरोबरच रसद आणि वाहनाची सोयही केली होती. तो व्हिडिओ कॉलद्वारे इतर आरोपींच्या संपर्कात होता. गेल्यावषी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये या कटाची माहिती मिळाल्यानंतर काही पोलीस अधिकारी आणि गुप्तचर अधिकाऱ्यांनी व्हॉट्सअॅप आणि इतर इंटरनेट मीडिया ग्रुपवरील चॅट्सवर नजर ठेवण्यास सुऊवात केली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article