For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आणखी एकाला अटक

06:17 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आणखी एकाला अटक
Advertisement

आप’चा निधी हाताळणाऱ्यावर कारवाई : लाच स्वरुपात प्राप्त 45 कोटी प्रचारात खर्च

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील अबकारी धोरण घोटाळ्याशी निगडित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करणाऱ्या ईडीने आणखी एका आरोपीला अटक केली आहे. चनप्रीत सिंह असे या आरोपीचे नाव असून त्याने 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकरता निधी व्यवस्थापन केले होते. चनप्रीतला 12 एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आले होते आणि दुसऱ्या दिवशी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चनप्रीतला 18 एप्रिलपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

Advertisement

दिल्लीतील घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आलेला हा 17 वा आरोपी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बीआरएस नेत्या के. कविता आणि अनेक मद्यउद्योजकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

चनप्रीत सिंहवर सीबीआयकडून कारवाई

चनप्रीत सिंहला यापूर्वी याच प्रकरणी सीबीआयने अटक केली होती. अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण सीबीआयच्या एफआयआरनंतर समोर आले होते. चनप्रीतने 2022 च्या गोवा निवडणुकीत पक्षाच्या निधीचा प्रचारासाठी वापर केला होता असे ईडीने न्यायालयात दस्तऐवज सादर करत म्हटले होते.

लाचेच्या रकमेचा वापर

साउथ ग्रूपचे सदस्य के. कविता, ओंगोलचे खासदार मगुंटा श्रीनिवासुलु रे•ाr, त्यांचे पुत्र राघव मंगुटा, उद्योजग सरथ चंद्र रे•ाr आणि अन्य लोकांनी दिल्लीती अबकारी परवान्यासाठी आम आदमी पक्षाला 100 कोटी रुपयांची लाच दिली होती असा आरोप आहे. लाच स्वरुपात प्राप्त रकमेपैकी 45 कोटी रुपयांचा वापर आम आदमी पक्षाने गोव्यातील प्रचारासाठी केला होता असा दावा ईडीने केला आहे.

कसे समोर आले नाव?

ईडीनुसार गोव्यात आम आदमी पक्षासाठी सर्व्हे वर्कर्स, एरिया मॅनेजिंग आणि असेंबली मॅनेजिंगचे काम पाहणाऱ्यांनी चनप्रीत सिंह यांचे नाव घेतले होते. या लोकांना चनप्रीतनेच पैसे दिले होते. मोठी रक्कम चॅरियट प्रॉडक्शन्स मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनाही वाटण्यात आली होती. चॅरियट प्रॉडक्शनला आम आदमी पक्षाने गोव्यातील प्रचारासाठी नियुक्त केले होते. याप्रकरणी कंपनीचे संचालक राजेश जोशीला ईडीने मागील वर्षीच अटक केली होती.

Advertisement
Tags :

.