महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डीआरडीओकडून आणखी एक क्षेपणास्त्र विकसित

06:28 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सैन्याची क्षमता वाढणार : डीआरडीओकडून पर्वतीय भागांमध्ये परीक्षण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय सैन्यामध्ये खांद्यावरील प्रक्षेपकाद्वारे डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. अशास्थितीत आता डीआरडीओने खांद्यावरून डागण्यात येणारे आणि तुलनेत कमी अंतरापर्यंत मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र विकसित पेले आहे. या क्षेपणास्त्राला सैन्याला सोपविण्यापूर्वी डीआरडीओ याचे परीक्षण करण्याच्या तयारीत आहे. क्षेपणास्त्राचे हे परीक्षण पर्वतीय भागांमध्ये होणार आहे.

भारतीय सैन्याच्या मागणीनुसार डीआरडीओने कमी अंतराची मारकक्षमता असलेले क्षेपणास्त्र विकसित केले आहे. या क्षेपणास्त्रांना स्वत:च्या ताफ्यात सामील करण्यात आल्यास वायुदलालाही मदत मिळणार आहे. सीमावर्ती क्षेत्रांमध्ये वेगवान ड्रोन, लढाऊविमाने आणि हेलिकॉप्टर यासारख्या हवाई लक्ष्यांना नष्ट करण्यासाठी भारतीय वायुदलाला अशाप्रकारच्या क्षेपणास्त्रांची आवश्यकता आहे.

यशस्वी परीक्षणानंतर या क्षेपणास्त्र यंत्रणेला सैन्याकडे सोपविण्यात येणार आहे. परीक्षण आणि आकलनानंतर सैन्य आणि वायुदल क्षेपणास्त्राला स्वत:च्या ताफ्यात सामील करणार आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली कमी अंतरासोबत दीर्घ पल्ल्याच्या लक्ष्यांचा भेद करण्यासही सक्षम असल्याचे डीआरडीओचे सांगणे आहे.

या प्रणालीचे सातत्याने आधुनिकीकरण केले जात असल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. भारतीय सैन्य स्वत:च्या अत्यंत कमी पल्ल्याची मारकक्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

 

Advertisement
Next Article