For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माळमारुती येथे आणखी एक जखमी वासरू आढळले

10:23 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
माळमारुती येथे आणखी एक जखमी वासरू आढळले
Advertisement

बेळगाव : माळमारुती परिसरात आणखी एक वासरू जखमी झाल्याचे आढळून आले आहे. वासरू जखमी झाल्याची माहिती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने जाऊन शुक्रवारी सकाळी त्या वासराला श्रीनगर येथील गो-शाळेमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुरुवारपासूनच हे जखमी वासरू एकाच ठिकाणी बसून होते. शुक्रवारी सकाळी तर त्याची प्रकृती खालावल्याने ते त्याठिकाणी मान टाकून पडले होते. काही जणांनी याची माहिती दिल्यानंतर राजू संकण्णावर आणि इतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्या वासराला वाहनातून श्रीनगर येथील गो-शाळेत दाखल करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांना तातडीने बोलावून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.