For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनच्या राजघराण्यावर आणखी एक आरोप

07:00 AM Mar 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनच्या राजघराण्यावर आणखी एक आरोप
Advertisement

विवाहापूर्वी डायना अन् केट यांची फर्टिलिटी टेस्ट करविल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था /लंडन

ब्रिटनचे राजघराणे पुन्हा एकदा चुकीच्या कारणामुळे चर्चेत आहे. अलिकडेच प्रकाशित एका पुस्तकात राजघराण्यासंबंधी काही नवे खुलासे झाले आहेत. यानुसार राजघराण्याच्या माजी सदस्य युवराज्ञी डायना यांना 1981 मध्ये तत्कालीन राजपुत्र चार्ल्स यांच्यासोबत विवाहापूर्वी फर्टिलिटी टेस्टला सामोरे जावे लागले होते. विशेष बाब म्हणजे त्यावेळी डायना यांना या चाचणीबद्दल कल्पना देखील नव्हती. युवराज्ञी डायना यांची सून केट मिडलटन (युवराज विलियम यांच्या पत्नी) यांनीही विवाहापूर्वी 2011 मध्ये हे परीक्षण करविले होते. या दोन्ही महिला कुठल्याही राजघराण्याशी संबंधित नव्हत्या, याचमुळे हे परीक्षण करविण्यात आले होते. ब्रिटनच्या राजघराण्याचे निकटवर्तीय राहिलेले टॉम क्विन यांनी एक पुस्तक लिहिले असून ते जागतिक प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या पुस्तकाचे नाव ‘गिल्डेड यूथ ः ऍन इंटिमेट हिस्ट्री ऑफ ग्रोइंग अप इन द रॉयल फॅमिली’ असे आहे. या पुस्तकातील एक भाग युवराज्ञी डायना आणि केट मिडलटन यांच्यावर आधारित आहे. यानुसार 1981 मध्ये विवाहापूर्वी डायना यांची फर्टिलिटी टेस्ट करविण्यात आली होती. रुग्णालयात आपल्याला कशासाठी हलविण्यात आले हेच डायना यांना माहित नव्हते असा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. यासंबंधीचा गौप्यस्फोट डायना यांनीच टॉम क्विन यांच्यासमोर केला होता असे समजते. ब्रिटनच्या राजघराण्यातील एखादा सदस्य अन्य राजघराण्याशी संबंधित नसलेल्या युवतीशी विवाह करत असेल तर त्या युवतीला फर्टिलिटी टेस्टला सामोरे जो लागते. ब्रिटिश राजघराणे संबंधित युवती भविष्यात आई होऊ शकणार की नाही हे आधीच जाणून घेऊ इच्छिते.

Advertisement

Advertisement
Tags :

.