महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ट्रम्प यांच्यावर पुन्हा प्राणघातक हल्ला

06:58 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोळीबारातून थोडक्यात वाचले, समर्थकांमध्ये संतापाची लाट, संशयित गुन्हेगाराला अटक

Advertisement

वृत्तसंस्था / फ्लोरिडा

Advertisement

अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने ते वाचले असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात फ्लोरिडा गोल्फ क्लब येथे घडली. संशयिताला अटक करण्यात आली असून त्याचे नाव रायन वेस्ली रुथ असे असल्याची माहिती देण्यात आली. हल्ल्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात असून या घटनेमुळे ट्रम्प समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

फ्लोरिडा गोल्फ क्लब येथे ट्रम्प यांचा निवडणुकीच्या प्रचारार्थ जाहीर कार्यक्रम होत असताना त्यांच्यावर साधारणत: 300 ते 400 मीटर अंतरावरून एके 47 मशिनगनमधून गोळीबार करण्यात आला. रुथ याने कार्यक्रमस्थानाच्या बाजूला असणाऱ्या झुडुपांमध्ये लपून हा गोळीबार केला. त्याने ट्रम्प यांची हत्या करण्याच्याच उद्देशाने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. तो हल्ला करण्यासाठी कार्यक्रमाच्या स्थानी काळ्या रंगाच्या कारमधून आला आणि नंतर कारमधून उतरुन झुडुपांच्या आडोशाने त्याने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. नंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची रायफल आणि कार जप्त करण्यात आली आणि त्यालाही बाहेर नेण्यात आले. फ्लोरिडा प्रशासनाने या घटनेच्या त्वरित चौकशीचा आदेश देण्यात आला.

दोन महिन्यांमधील दुसरा हल्ला

गेल्या दोन महिन्यांमध्ये ट्रम्प यांच्यावर झालेला हा दुसरा प्राणघातक हल्ला आहे. प्रथम हल्ला ते पेन्सिल्व्हानिया प्रांतामध्ये निवडणूक प्रचार सभेत भाषण करत असताना 13 जुलैला झाला होता. त्यावेळी गुन्हेगाराने मारलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती. त्यांना काही प्रमाणात रक्तस्त्रावही झाला होता. यावेळी त्यांच्यावर झाडलेल्या गोळ्यांपैकी एकही गोळी त्यांना लागलेली नाही. गोळीबार होत असल्याचे लक्षात येताच ट्रम्प यांना त्यांचे सुरक्षा रक्षक आणि इतर उपस्थितांनी त्वरित सुरक्षित स्थळी नेण्यात आले. ते त्वरित या धक्क्यातून सावरले आहेत.

हल्ल्याचे संभाव्य कारण

ट्रम्प यांच्यावर गोळीबार केलेला रुथ हा युव्रेनचा समर्थक असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या युक्रेनचे रशियाशी युद्ध होत आहे. ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यास ते युक्रेनला अमेरिकेकडून केले जाणारे धोरणात्मक आणि सैनिकी साहाय्य बंद केले जाईल किंवा कमी केले जाईल, असे वाटल्याने त्याने ट्रम्प यांना निवडणुकीआधीच संपविण्याचा प्रयत्न केला अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र, हे प्रथमदर्शनी कारण असून सविस्तर तपास झाल्यानंतरच संशयिताचा हल्ल्यामागचा उद्देश आणि त्याचे या हल्ल्याच्या संदर्भात अन्य कोणाशी असलेले संबंध यांची माहिती उघड होऊ शकेल, असे फ्लोरिडा प्रशासनाचे म्हणणे आहे.

सुरक्षा रक्षकांचे प्रसंगावधान

ट्रम्प यांचा कार्यक्रम हो असताना सुरक्षा रक्षकांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचा जीव वाचला, अशी माहिती समोर आली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकताच रक्षकांनी त्वरित ट्रम्प यांच्याभोवती कडे केले. त्यामुळे हल्लेखोराच्या पुढच्या गोळ्यांचे नेम चुकले. नंतर ट्रम्प यांना त्वरित कारमध्ये बसवून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. आपण सुखरुप आहोत, असा संदेश ट्रम्प यांनी नंतर प्रसिद्ध केला आहे.

संशयिताला पश्चात्ताप नाही

संशयिताने गोळीबार केल्यानंतर कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. कार्यक्रमस्थळी उपस्थित असणाऱ्या सुरक्षा सैनिकांनी त्वरित त्याची नाकाबंदी करुन त्याला पकडले. त्याच्याकडून एके 47 मशिनगन आणि काही काडतुसे अशी शस्त्रे जप्त केली. संशयित रुथ हा पोलिसांच्या ताब्यात असतानाही त्याच्या चेहऱ्यावर दु:ख किंवा चिंतेचे भाव नव्हते. आपण केलेल्या कृत्यासंबंधी कोणताही पश्चात्ताप त्याला झालेला नाही. त्याची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असून तो निरिक्षणाखाली आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेत काही स्थानी हिंसाचार

ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड संतापाचा उद्रेक झाला. त्यामुळे फ्लोरिडासह अनेक प्रांतांमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसाचार करुन सावजनिक मालमत्तेची हानी केली, अशी माहिती आहे. ट्रम्प समर्थकांच्या या कृतीचा निषेध विद्यमान अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी केला आहे.

हॅरिस यांच्यावर हल्ला का नाही?

ट्रम्प यांचे समर्थक आणि जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच या हल्ल्यांकरिता त्यांनी ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस आणि डेमॉव्रेटिक पक्षाच्या इतर नेत्यांना अप्रत्यक्षरित्या उत्तरदायी ठरविला आहे. असे हल्ले केवळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच का होतात? तसे हल्ले, कमला हॅरिस यांच्यावर का होत नाही, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

रुथ हा कोण आहे?

ट्रम्प यांच्यावर हल्ला फ्लोरिडा प्रांतातील मार्टिन काउंटी या भागात झाला आहे. या भागाचे अधिकारी विल्यम सिंडर यांनी हल्लेखोर रेयान वेस्ले रुथ याची माहिती प्रसिद्ध केली आहे. 58 वर्षांचा रुथ यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून 2002 मध्ये त्याच्यावर घातक आणि जीवघेणे शस्त्र बाळगल्याच्या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तो युक्रेनचा अतिरेकी समर्थक असल्याची माहितीही देण्यात आली.

प्रतिस्पर्ध्यांच्या प्रतिक्रिया

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील घातक हल्ल्याची माहिती त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि डेमॉव्रेटिक पक्षाच्या नेत्या कमला हॅरिस आणि विद्यमान अध्यक्ष जोसेफ बायडेन यांना देण्यात आली. ट्रम्प या हल्ल्यातून सुखरुप वाचले, याचे आपल्याला मोठे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेत हिंसाचाराला स्थान नाही, असे वक्तव्य कमला हॅरिस यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यामुळे गोंधळ

ड अध्यक्षीय निवडणूक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने चिंता

ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा अमेरिकेसह जगात सर्वत्र जोरदार निषेध

ड गेल्या दोन महिन्यांमधील ट्रम्प यांच्यावरचा हा दुसरा प्राणघातक हल्ला

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article