महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जोधपूरची अनोखी एक्स्पे्रस

05:05 AM Nov 19, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानातील एक महत्वाचे शहर जोधपूर येथे एक अनोखी एक्स्पे्रस प्रवास सेवा देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावाने ही एक्स्प्रेस गाडी चालविण्यात येत आहे. सध्याच्या काळात इंधनाचे दर वाढल्याने प्रवास महाग झाला आहे. मात्र, या एक्स्प्रेसमधून नागरीकांना विनामूल्य प्रवासाची सोय उपलब्ध आहे.

Advertisement

मात्र, या विनामूल्य सेवेचा लाभ उठविण्यासाठी नागरीकांना एकच अट पाळावी लागते. ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संदर्भात त्यांना प्रशंसोद्गार काढावे लागतात. त्यानंतर त्यांना या गाडीतून विनामूल्य प्रवास करता येतो. यावरुन असे वाटण्याची शक्यता आहे की ही बस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने चालविण्यात येत आहे. तथापि, या बसचा त्यांच्याशी काही संबंध नाही. ही बस नेमीचंद मोदी नामक मालकाची आहे. त्याने ती भाजपचा प्रचार करण्यासाठी उपयोगात आणली आहे. त्यामुळे जे लोक भाजपची उघडपणे स्तुती करतात किंवा भाजपच्या कामाची प्रशंसा करतात त्यांना या बसमधून विनामूल्य प्रवास करता येतो. जोधपूर शहरात ही अनोखी प्रचार बस आकर्षणाचे केंद्र बनली असून अनेक मतदार आणि नागरीक तिचा ही अट पाळून लाभ घेत आहेत. त्यामुळे जोधपूर शहरभर तिचा दिवसभर प्रवास होत असतो.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article