महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वार्षिक राशिभविष्य 2024 : धनु

09:50 AM Jan 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नाविन्याचा ध्यास आणि उत्साह नेहमी ओसंडून वाहात असतो. मित्रपरिवार मोठा असतो. साहसी बलशाली असल्याने थोड्या आखडु स्वभावाच्या असतात. कोणाच्याही बंधनात राहणे यांना पसंत नसते. फटकळ असल्याने तोंडावर सरळ बोलण्याचे धाडस या व्यक्ती करतात.स्वातंत्र्य आवडते. हुशारी प्रतिभा असल्याने या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात.

Advertisement

धनू राशीच्या लोकांना अगदी मनापासून तरूण राहायला आवडतं. नेहमी काहीतरी नवं करण्याचा उत्साह या व्यक्तींमध्ये असतो. तसंच आपल्या सीमा ओलांडून यांना काहीतरी करायचं असतं. या व्यक्तींना सतत हसणे खिदळणे खूपच आवडते. लहान सहान गोष्टीतही या व्यक्ती आनंद शोधतात. तुम्ही या व्यक्तींबरोबर असाल तर तुम्हाला कधीही कंटाळवाणे वाटणार नाही, याची नक्की हमी आहे. यांच्या याच स्वभावामुळे मित्रपरिवार मोठा असतो. कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्या आयुष्यात साहस या व्यक्ती आणतातच. प्रत्येक वेळी नवा विचार, नव्या रूटीनमुळे यांचे आयुष्य कधीच कंटाळवाणे नसते. त्यामुळे अनेकांना या व्यक्तींचा हेवा वाटतो. धनू राशीच्या व्यक्ती आपले प्रेम दर्शविण्यासाठी कधीही समोरून सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर आपल्या कृतीतून दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. या राशीच्या व्यक्तींना बलशाली राशीपैंकी एक मानले जाते. पण या व्यक्ती कधीतरी आपल्या वागणुकीने स्वत:चं नुकसान करून घेतात. कारणाशिवाय राग येणे हा यांचा सर्वात वाईट दोष आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल मनात अढी करून घेतली तर समोरच्या व्यक्तीचं ऐकून न घेता या व्यक्ती रोष ओढवून घेतात. जिद्दी आणि आखडू स्वभावाच्या असतात. आपले व्यक्तीत्व लपवून ठेवायची यांना सवय असते. यांना एखादी गोष्ट न आवडल्यास, ती गोष्ट कधीच स्वीकारत नाहीत. बरेचदा स्वत:ची चूक असूनही मान्य करत नाहीत. या व्यक्तींना आपले स्वातंत्र्य खूपच आवडते. अत्यंत उत्साही आणि सतत मजेत राहणाऱ्या या व्यक्ती असतात. कोणीही यांना आपल्या नियंत्रणात ठेवणे आवडत नाही. कोणत्याही प्रकारची बंधने यांना चालत नाहीत. आपल्या अटी आणि शर्तींवर जगणाऱ्या या व्यक्ती आहेत. स्वभावाने जिद्दी आणि हट्टी असल्याने खूपच फटळत असतात. या राशीच्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली असून हुशारही असतात. त्याचबरोबर या व्यक्ती अत्यंत आशावादी, धाडसी आणि विसरभोळ्याही असतात. यांच्यामध्ये हुशारी आणि प्रतिभा खूपच असते ज्यामुळे या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात.

Advertisement

ग्रहमान

गुरु वर्षाच्या सुरवातीपासूनच तुमच्या पंचम भावात विराजमान राहतील. यामुळे तुमच्या जीवनात योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतांचा विकास होईल. संतान संबंधित सुखद वार्ता मिळू शकते. तुमची बुद्धी योग्य दिशेत राहील. आपल्या शिक्षणाला उत्तम पद्धतीने करण्याची इच्छा ठेवाल. लांब यात्रेपासून लाभ होईल. तुमच्या मनात धार्मिक विचार येईल. तुमच्या कमाईमध्ये वाढ होईल. वर्षाच्या उत्तरार्धात 1 मे ला गुरु सहाव्या भावात जाऊन खर्चात वाढ होईल. तुम्हाला पोटासंबंधित समस्यांचा सामना करावा लागेल. शनी पूर्ण वर्ष तिसऱ्या भावात राहून तुम्हाला साहस आणि पराक्रम देईल. कार्यक्षेत्रात तुमच्या सहकर्मींकडून उत्तम सहयोग प्राप्त होईल. यामुळे तुम्ही करिअरमध्ये उत्तम प्रदर्शन करण्यात यशस्वी राहाल. खरे मित्र समजतील. राहु पूर्ण वर्ष तुमच्या चौथ्या आणि केतू तुमच्या दहाव्या भावात राहतील. सुखस्थानातील राहुमुळे जमिनीचे व्यवहार करताना काळजी घेतली पाहिजे. केतुचे भ्रमण आपल्यासाठी शुभ ते मिश्र फळ देणारे असेल. चतुर्थात राहूमुळे वाहन सावकाश चालवा, अन्यथा नुकसान. 1 मे रोजी गुरु सहाव्या भावात जाऊन खर्चात वाढ आणि उदरासंबंधित समस्यांचा सामना करावा लागेल. एप्रिलपासून मे पर्यंतची वेळ खूप रोमँटीक राहील कारण, या वेळी शुक्र तुमच्या पंचम भावात राहील. पूर्ण वर्ष केतू महाराज तुमच्या दशम भावात राहतील. यामुळे तुम्हाला आपल्या नोकरीमध्ये काही असहजता वाटेल. तुमचे मन सतत कामापासून भटकेल. मोहभंग होण्याची स्थितीही होऊ शकते. वर्षाचा पूर्वार्ध अधिक अनुकूल असून उत्तरार्धात काही आव्हाने समोर असतील. गुरु पंचम भावात असून  एकादश आणि प्रथम भाव तसेच तुमच्या भाग्य स्थानाला पाहतील. योग्य निर्णय घेऊन तुम्ही आपली वित्तीय स्थिती मजबूत बनेल. विवाहासाठी वर्षभर उत्तम गुरुबळ आहे.

नोकरदार

तुमच्यासमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी तुम्ही नव्या कल्पना लढवाल. व्यवहार अत्यंत सुरळीत आणि सहज पार पडतील कारण तुम्ही स्पर्धकांच्या एक पाऊल पुढे असाल. एकाहून अधिक स्रोतांमधून उत्पन्न मिळेल. क्लाएंट्स, सहकारी आणि इतर संबंधित व्यक्ती यांच्याशी असलेले संबंध सुधारतील. तुम्ही या काळात काही चैनीच्या वस्तू विकत घ्याल. एकूणातच हा काळ तुम्हाला उत्पन्न मिळवून देणारा समृद्धीचा असेल. तुम्हाला अनेक अनपेक्षित व आनंददायी गोष्टी मिळतील. तुमची पत्नी आणि नातेवाईकांकडूनही आनंद मिळेल. न्यायालयीन खटले आणि याचिकांमध्ये यश मिळेल. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी कराल. करारांमधून भरघोस फायदा मिळेल. तुमच्या शत्रुंवर एकूणच तुमचे वर्चस्व राहील. आर्थिक बाबींचा विचार करता हा काळ अनुकूल आहे. वरिष्ठांकडून किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही चांगली प्रगती कराल. कारकीर्दीमध्ये आणि कौटुंबिक पातळीवर तुम्हाला अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. तुमच्या कार्यालयीन कर्तव्याच्या/ प्रवासाच्या दरम्यान तुमची ज्या व्यक्तींशी भेट होईल, त्यांच्यातर्फे तुम्हाला चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमच्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल.

स्त्री वर्ग

तुमच्या फिरण्याच्या आंतरिक इच्छेमुळे या काळात चंचल असाल. तुम्हाला एका कोपऱ्यात बसणे आवडत नाही. त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. तीर्थाटन कराल. या काळात तुम्हाला नक्कीच अधिकार मिळेल. परदेशातील तुमचे हितसंबंध उपयोगी पडतील आणि त्या संबंधातूनच तुम्हाला अनपेक्षित उत्पन्न आणि अपेक्षित सत्ता मिळू शकेल. तुमची गती कायम ठेवा, क्षमतांवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळेच स्थान प्राप्त होणार आहे. कुटुंबातील वातावरण तुम्हाला सहकार्य देणारे ठरेल. दूरचे प्रवास केल्यास त्यातून लाभ होऊ शकेल. तुम्ही धार्मिक कार्यात स्वारस्य घ्याल आणि दानधर्म कराल. या वर्षी तुमच्या नशीबात चांगला मोबदला मिळेल. तुमची काम करण्याची तयारी असेल तर निश्चित फायदा होणार आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. या काळात तुम्हाला प्रसिद्धीसुद्धा मिळेल. तुम्ही व्यावसायिक पातळीवर खूप प्रगती कराल.विरोधकांवर विजय मिळवाल. नवा व्यवसाय स्वीकाराल, नवीन मित्र कराल. तुमचे सगळ्यांशीच सलोख्याचे संबंध राहतील. हा काळ तुमच्यासाठी विविध अंगांनी अनुकूल आहे. तुमच्या आजुबाजूचे वातावरण इतके चांगले आहे की, प्रत्येक समस्या आपोआप सोडविली जात आहे. तुमच्या घरचे व्यवहार एकदम सुरळीत सुरू राहतील. तुमची जबरदस्त इच्छा आणि उर्जाही उच्च असेल. उच्चभ्रू वर्गाकडून तुम्हाला मदत मिळेल, तुमची पत वाढेल आणि शत्रूंचा बिमोड होईल. तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आजुबाजूला आल्हाददायक वातावरण असेल. तिसऱ्या भावात शनी महाराज भावंडांमध्ये काहीशी चढ-उतार स्थिती दाखवतात. राहू पूर्ण वर्ष तुमच्या चतुर्थ भावात राहतील यामुळे कौटुंबिक जीवनात चढ-उतार राहील. तुम्हाला कुटुंबातील लोकांच्या उपेक्षेपासून बचाव करावा लागेल.

विद्यार्थी वर्ग

वर्षाची सुरूवात विद्यार्थ्यांसाठी उत्तम राहील. गुरु 1 मेपर्यंत तुमच्या पंचम भावात राहील. प्रभावित करेल. तुमची बुद्धी तेज होईल. तुम्ही ज्ञान सहज प्राप्त करण्याची इच्छा ठेवाल. यासाठी प्रयत्नरत राहाल आणि या व्यतिरिक्त, तुम्हाला शिक्षणात उत्तम परिणाम प्राप्त होईल. 1 मे नंतर गुरु तुमच्या सहाव्या भावात जातील. यामुळे तुम्ही अधिक उत्साहित होऊन शिक्षणावर लक्ष द्याल, नंतरही ऑगस्टपासून ऑक्टोबरमध्ये वेळ चिंताजनक असू शकते. त्या नंतर स्थिती सामान्य होत जाईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article