For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओवळीये ग्रामदैवत गांगोबाचा उदया वार्षिक जत्रोत्सव

04:10 PM Jan 17, 2024 IST | अनुजा कुडतरकर
ओवळीये ग्रामदैवत गांगोबाचा उदया वार्षिक जत्रोत्सव
Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
ओवळीये गावचे ग्रामदैवत श्नी गांगोबाचा देवस्थानचा वार्षिक उत्सव गुरूवारी १८ जानेवारी रोजी होणार आहे. नवसाला पावणारा आणि भाविकांच्या इच्छीत मनोकामना पुर्ण करणारा अशी गांगोबा देवस्थानची ख्याती असल्याने यादिवशी हजारो भाविक गांगोबा चरणी नतमस्तक होणार आहे.यानिमित्त सकाळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर गांगोबाला भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात येणार आहे. त्यानंतर गांगोबाच्या दर्शनास प्रारंभ होणार असुन श्रीच्या कृपाआशीर्वादासह ओटी भरणे, नवस बोलणे, फेडणे, केळी, नारळ ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहे. रात्री सवाद्य पालखी सोहळ्यानंतर पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानचे मानकरी आणि ओवळीये ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.